Mopa Airport: मोपा विमानतळाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर गंडांतर, उड्डाण पूल उभारणीनंतर रस्ताबंदीची शक्यता

Sukekulan-Mopa Flyover: सुकेकुळणहून वारखंड-नागझरकडे जाणारा रस्ता पूर्वापार आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाले. मात्र, उड्डाण पूल महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झाले नव्हते.
The old road is likely to be closed if the Sukekulan-Mopa flyover is commissioned
The old road is likely to be closed if the Sukekulan-Mopa flyover is commissioned
Published on
Updated on

Mopa Airport: सुकेकुळण ते मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा उड्डाण पूलमार्ग खुला झाल्यावर सध्या येथील गावांमधून विमानतळाकडे जाणारा नेहमीचा रस्ता बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उड्डाणपूल मार्गावर टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे मोपा पंचक्रोशीतील टॅक्सी व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

त्यांनी आपली व्यथा केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव, राज्याच्या हवाई वाहतूक खात्याचे संचालक, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव यांना आज ईमेलद्वारे कळविली आहे.

सुकेकुळणहून वारखंड-नागझरकडे जाणारा रस्ता पूर्वापार आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाले. मात्र, उड्डाण पूल महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम झाले नव्हते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला रस्ताच रुंद करून तो नागझरहून पुढे विमानतळापर्यंत नेला. दुसरीकडे उड्डाण पुलावरील रस्त्याचे कामही वेगाने पूर्णत्वाकडे झेपावत आहे. त्यामुळे येत्‍या दोन महिन्यांत तो रस्ता विमानतळ वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.

The old road is likely to be closed if the Sukekulan-Mopa flyover is commissioned
Mopa Airport : मोपा विमानतळ पीडितांबाबतही दानशूरपणा दाखवावा; पेडणेत तीव्र संताप

...तर टॅक्सीचालकांना १० किमीचा फेरा

सरकारने येथील बेरोजगारांना ‘गोंयचो पात्राव’ योजनेंतर्गत टॅक्सी घेऊन दिल्या आहेत. असे झाले तर त्यांना दर खेपेमागे टोल द्यावा लागेल, शिवाय जुना रस्ता बंद केल्याने ८ ते १० किलोमीटरचा वळसा घालून गावातून सुकेकुळण येथे येऊन विमानतळाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा वापर करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com