Taleigao VP Election: ताळगावकरांचा माझ्यावर विश्‍वास : बाबूश मोन्सेरात

Taleigao VP Election: प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटद्वारे उमेदवारी अर्ज दाखल
Taleigao VP Election
Taleigao VP ElectionDainik Gomantak

Taleigao VP Election

ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी आम्ही पाचव्यांदा उमेदवार उभे केले आहेत.

ताळगावच्या जनतेला माझ्यावर आणि मला ताळगावच्या जनतेवर पूर्ण विश्‍वास असून मागीलप्रमाणे याही निवडणुकीत ते आमच्या बाजूने उभे राहतील व आमच्या उमेदवारांना निवडून आणतील, अशी मला खात्री आहे,असे प्रतिपादन महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केले.

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात तसेच फ्रंटचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मान्सेरात पुढे म्हणाले, लोकशाहीत विरोधक महत्त्वाचे असतात. ज्यावेळी आपण चुकत असतो त्यावेळी ते विरोध करून योग्य तो निर्णय घेण्यास मदत करतात. ताळगावातील विरोधकांनी समोर येऊन निवडणूक लढवावी.

आम्ही ताळगावच्या जनतेसाठी योग्य आहोत की नाही, हे मतदानातून दाखवून देऊ. माझ्या एका विरोधकाने सांगावे की, मी त्यांना कधी त्रास दिला आहे. किंवा माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांनी सांगावे, की तुम्ही अमक्या गटातले तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी प्रत्येकाला सर्वतोपरी मदत करत आलो आहे.

Taleigao VP Election
Goa Police: 238 वॉरंट, 41 शस्त्रे जमा; गोवा पोलिसांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे उमेदवार

सिद्धी केरकर, आग्नलो द कुन्हा, हिलिना परेरा, रतिका गावस, उशांत काणकोणकर, इस्तेल डिसोजा, जानू रोझारियो, मारिया फर्नांडिस, संंजना दिवकर, सागर बांदेकर, सिडनी बार्रेटो. ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल आहे. तसेच पंचायतीसाठी मतदान २८ एप्रिल रोजी होणार आहे.

महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व!

ताळगावच्या जनतेला आमच्यावर विश्‍वास आहे, तसेच आमचे पंच सदस्य देखील सक्रिय आहेत. ताळगावातील पंचसदस्य जनसेवेसाठी सदोदित तत्पर असतात. काही पंचांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर सात उमेदवार नवे दिले आहेत. यावेळी महिलांनाही प्रतिनिधित्त्व मोठ्या प्रमाणात दिले आहे.

ताळगाव पंचायत क्षेत्रात सांडपाणी, उद्यान व्यवस्थापन, कचरा व्यवस्था, गावाची स्वच्छता आदी विषयांवर अधिक भर देण्यात येत आहे. त्यासोबतच, ताळगावमध्ये मार्केट उभारण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचे जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com