Goa crime News: एलन डिसोझाच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी, संशयितांची कबुली !

Goa crime News: वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे
Goa Crime Case
Goa Crime Case Dainaik Gomantak
Published on
Updated on

हडफडें-बागा येथील अंतर्गत रस्त्यावर 25 आॉगस्टच्या रात्री मृतावस्थेत सापडलेल्या आंसगांव-बादे येथील एलन डिसोझाच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. एलनच्या वडिलांच्या तक्रारीवरून तपास करताना हणजुणे पोलिसांनी स्थानिक तरूण संशयित प्रमोद उर्फ बाबु खोर्जुवेकर आणि शिरीष गोवेकरला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विषारी द्रव्य पाजून दोघांनी एलनचा खून केल्याचा संशय आहे.

Goa Crime Case
Goa Police: हैद्राबाद पोलिसांना गोवा पोलिसांचे उत्तर, शोभित सक्सेना म्हणाले...

अधिक असे की, 25 ऑगस्टच्या रात्री हडफडें-बागा येथील जेमसन रेस्टॉरंटच्या परिसरात एलनचा मृतदेह पोलिसांना संशयास्पद स्थितीत सापडला होता. हणजुणे (Anjuna) पोलिसांनी दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. मात्र, मृतदेहावर कोणतीही जखम आढळून न आल्याने एलनचे वडिल आंतोनियो डिसोझा यांनी 28 तारखेला हणजुणे पोलिसांत खुनाचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली.

यावर पोलिसांनी हडफडे-बागा येथील अंतर्गत रस्त्याच्या जवळपास असलेल्या हॉटेल्सच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात एलनसोबत स्थानिक तरूण संशयित प्रमोद उर्फ बाबु खोर्जुवेकर आणि शिरीष गोवेकर असल्याचे निदर्शनास आले.

Goa Crime Case
Goa Corona Update: गोव्यात आज 76 नवे कोरोनाबाधित, 127 जणांना डिस्चार्ज

दुचाकीवरून खाली पाडले-

हणजुणेचे पोलिस निरिक्षक प्रशल देसाई यांनी सांगितले, की संशयितांनी घटनेच्या रात्री एलनला आपण चालवित असलेल्या दुचाकीवरुन बेशुद्धावस्थेत खाली रस्त्यात पाडल्याचे कबूल केले.

दोन दिवसांनी जाणार होता विदेशात-

मुळ बादें -आंसगाव (Assagao) येथील रहिवासी असलेला एलन डिसोझा दुबईत नोकरीला होता. 21 ऑगस्ट रोजी तो सुटी घेऊन घरी आला होता. 27 तारखेला तो परतणार होता. मात्र, त्यापूर्वीच गुरुवारी रात्री आपल्या जवळच्या मित्रांसमवेत एलन डिनर पार्टीसाठी बाहेर पडला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com