Parra News : निरंकाल येथील विद्यार्थ्यांनी घेतला आनंददायी शिक्षणाचा अनुभव; चिकित्सक बुद्धीला चालना

Parra News : संवेदन केंद्राचा उपक्रम
Parra
Parra Dainik Gomantak

Parra News : पर्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमांशी निगडित विविध उपक्रम राबवून मुलांना कृतिशील शिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच शिग्नेव्हाळ, निरंकाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पाडला.

साखळीतील संवेदन केंद्रातर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यात मुलांनी उत्साहाने सहभागी होत शिक्षणाचा आनंद लुटला.

यावेळी राबविलेल्या उपक्रमांमध्ये चौकोन, आयत, वर्तुळ, त्रिकोण असे चित्राचे आकार शिकवले. त्यानंतर मुलांनी आपली चिकित्सक बुद्धी वापरून विद्यालयात परिसरात अशा आकाराची चित्रे शोधून त्याची नोंदी आपल्या वहीत केली व त्यानंतर सादर केली.

वस्तूंचा क्रम लावणे अशा उपक्रमावेळी तर निर्णय क्षमताची घालमेल होताना दिसून आली. गटाने केलेल्या या कृतीत मुलांचे विविध कलागुण दिसून आले.

या शैक्षणिक उपक्रमाच्या जोडीला बडबडगीते, बालगीते आणि मनोरंजनाचे खेळ खेळल्याने मुलांनी एक दिवस शिक्षण घेता घेता आनंदाने घालविला.

निरंकालातील कातकरी म्हणजे वानरमारे समाजाच्या एकंदरीत शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱ्या साखळीतील संवेदन केंद्रातर्फे हा उपक्रम कातकरी मुले शिकत असलेल्या शिग्नेव्हाळ निरंकाल प्राथमिक विद्यालयात राबवला.

यावेळी संस्थेचे कातकरी प्रकल्प समन्वयक दशरथ मोरजकर आणि प्रकल्प प्रशिक्षक बाबनी मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका आर्या नाईक यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पालक संघाच्या अध्यक्ष स्वेता गावडे व इतर पालकांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमावे पालकांनी सर्व मुले आणि पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक भोजन बनवले. या भोजनाचा आस्वाद कातकरी व इतर सर्व मुले, पाहुणे आणि शिक्षकवर्ग यांनी एकत्रित बसून घेतला.

बालगीतांनी वातावरण प्रफुल्लित

या एकंदर कार्यक्रमात विविध प्रकारची मनोरंजनात्मक गाणी, बडबडगीते, बालगीते तसेच स्मरणशक्ती विकसित करणारी बालगीते गायन आणि ती मुलांकडून नृत्यांच्या तालावर म्हणवून घेणे मुलांसाठी आकर्षण ठरले. बाबनी मापारी यांनी मुलांना वेगवेगळी गाणी तसेच गाण्यानुसार नृत्य करून घेतले.

Parra
Goa E-Beat Book App: आता गोवा पोलिसांवर राहणार वॉच, मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केले 'ई बीट बुक अ‍ॅप'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com