Vasco News: रेल्‍वे कामगारांवर दगडफेक

14 जणांविरोधात गुन्‍हा; जेसीबी मशीनचीही मोडतोड; 45 हजारांचे नुकसान
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak

Vasco News: वेळसाव येथे रेल्वेच्या कामगारांवर दगडफेक करून त्यांना जखमी करणे व जेसीबी मशीनची तोडफोड केल्‍याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ओलेन्सियो सिमॉईश, ऑर्विल दोरादो, फ्रान्सिस ब्रागांझा आणि पंच कामिलो डिसोझा यांच्यासह एकूण 14 जणांवर दंगल माजविण्याच्या आरोपाखाली वास्‍को पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

या सर्वांनी सूर्या कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी काम करणाऱ्या कनई सरदार आणि रामेश्वर सरदार या मजुरांवर हल्ला केला. ही घटना काल रविवारी दुपारी घडली. वेळसाव येथे एका रेल्वे पुलाचे काम सुरू आहे.

Vasco News
H3N2: राज्‍यात ‘एच3-एन2’चा शिरकाव; आढळले 2 रुग्‍ण

स्थानिकांचा या कामाला विरोध आहे. त्यामुळे मागचे चार दिवस या भागात तणाव आहे. संतप्‍त जमावाने काल कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रेल्वे विकास निगमच्या कामासाठी वापरलेल्या जेसीबी वाहनाचीही दगडफेक करून नुकसान केले.

त्‍यात सुमारे 45 हजारांचे नुकसान झाल्‍याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भादंसंच्या 143, 147, 148, 324, 427 आणि 149 या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमरनाथ पासी करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com