गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान सुरू करा

प्रदीप घाडी आमोणकर: मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा बैठकीत निर्णय
Gomantak Marathi Samaj
Gomantak Marathi SamajDainik Gomantak

मराठीच्या उत्कर्षासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटण्याचा निर्णय गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभेत घेण्यात आला. सरकारने मराठी भाषेच्या विकासासाठी गोमंतक मराठी अकादमीचे बंद केलेले अनुदान सुरू करून मराठीवर केलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी करणारा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.

Gomantak Marathi Samaj
‘पाडेली’ मिळेनात, अन्‌ नारळ पडेनात!

यावेळी अकादमीच्या सदस्यांच्या नऊ जागांसाठी गट क्र. १ मधून - रवींद्र नंदा बोरकर व स्नेहा अमोल मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली. गट क्र. ३ मध्ये - उदय कृष्ण मांद्रेकर, प्रभाकर ढगे व भारत बागकर यांची बिनविरोध निवड झाली. गट क्र. ४ - हेमंत कमलाकांत दिवकर यांची निवड झाली. गट क्र. ६ मध्ये प्रदीप पुंडलिक घाडी आमोणकर व सुदीप नारायण ताम्हणकर यांची निवड झाली. गट क्रमांक १० साठी रोहिदास नाईक यांची निवड झाली.

यावेळी आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त संमत करण्यात आले. चिटणीसांनी सादर केलेल्या अहवालावर चर्चा करून तोही संमत करण्यात आला. तसेच मागील वर्षाचा नफा - तोटा ताळेबंद संमत करण्यात आला.

यावेळी प्रभाकर ढगे, अमृत आगरवाडेकर, प्रकाश धुमाळ, सुदेश कोचरेकर, रोहिदास नाईक, ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, हेमंत दिवकर, स्नेहा मोरजकर यांनी विविध सूचना करत ठराव मांडले.

Gomantak Marathi Samaj
संकूल उभारताय; यापुढे भूजल पुनर्भरण सक्तीचे! जलस्त्रोत खात्याचे फर्मान...

अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी सर्वांचे स्वागत करून अकादमीच्या कार्याचा आणि एकूण विस्ताराचा आढावा घेतला. मराठी भवनाच्या वास्तूची डागडुजी करण्यासाठी तसेच इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून सरकारनेही अकादमीच्या उज्वल भवितव्यासाठी तसेच मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी केली.

मराठी भाषा, मराठी संस्कृती ही जनसामान्यांत रुजलेली आहे. तिचे अस्तित्व कोणी नष्ट करू शकत नाही. ते अबाधित आहे. यापुढेही हजारो वर्षे ते अबाधित राहील. सरकारने मराठी अकादमीला योग्य अनुदान देऊन सहकार्य करावे, अशी मागणी अमृत आगरवाडेकर यांनी केली.

अध्यक्षपदी प्रदीप घाडी आमोणकर यांची फेरनिवड

गोमंतक मराठी अकादमी कार्यकारिणीची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रदीप घाडी आमोणकर यांची फेरनिवड झाली, तर उपाध्यक्षपदी नरेंद्र आजगावकर यांची निवड झाली. कार्यकारिणीच्या सात जागांसाठी प्रभाकर ढगे, भारत बागकर, सुदेश कोचरेकर, महादेव गवंडी, प्रकाश धुमाळ, प्रकाश कळंगुटकर व श्यामसुंदर कवठणकर यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी सुदेश कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, तर सदस्य म्हणून श्यामसुंदर कवठणकर व महादेव गवंडी यांनी सहकार्य केले.

Gomantak Marathi Samaj
Valpoi Health Center: वाळपई आरोग्य केंद्रात लवकरच सर्व शस्त्रक्रिया

‘अकादमी जनमानसात रुजलेली’

उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर म्हणाले, की मराठी भाषा, मराठी संस्कृतीच्या जोपासनेसाठी, त्याच्या संवर्धनासाठी मराठी अकादमीचे सदस्य आपल्यापरीने काम करत आहेत. भविष्यातही त्यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे. यापूर्वी शेकडो अकादमीचे सदस्य होऊन गेले आणि साहित्यिक, कलाकार, मराठी भाषक अशा दिग्गज सदस्यांनी मराठी भाषेचा विस्तार केला. त्यांच्यामुळे अकादमी जनमानसात रुजलेली आहे. आजही अकादमीचे पावित्र्य आणि त्याचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

‘मराठी भाषा सर्वांच्या हृदयात’

अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी अकादमीच्या विकासासाठी आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे तसेच प्रत्येक तालुक्यात मराठी अकादमीतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करावे अशा सूचना केल्या. मराठी ही गोमंतकीयांच्या हृदयसिंहासनावर असलेली जनमानसाची भाषा आहे. तिचे पावित्र्य पोर्तुगीज राजवटीतही नष्ट झाले नाही. सर्वांच्या हृदयातील मराठी भाषा अशीच कायम अबाधित राहणार आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अकादमीची झालेली अवस्था व त्या अवस्थेतून पार पडून अकादमीला परत गतवैभव प्राप्त करण्यासाठी आपण काम केले. सर्वांचे सहकार्य मिळाल्यास अकादमी पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com