Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak

South Goa : दक्षिणेतून भाजपचाच उमेदवार निवडून येईल! मंत्री रवी नाईक यांना विश्वास

South Goa : देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या समृद्धीसाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात येणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

South Goa :

फोंडा, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, असा दावा फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी ५ रोजी पत्रकारांशी बोलताना केला.

देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या समृद्धीसाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात येणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फोंडा मतदारसंघासह दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात प्रचारात भाजपनेच आघाडी घेतली आहे. भाजपच्या प्रचार सभांना लोकांनी प्रचंड उपस्थिती लावून आपला पाठिंबा भाजपच्या उमेदवारांना दिला आहे. या पाठिंब्याच्या जोरावरच यावेळेला दक्षिण गोव्यात भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे सांगताना उत्तर गोव्यातही तीच स्थिती राहील, असे रवी नाईक म्हणाले.

दरम्यान, रवी नाईक यांनी फोंडा तालुक्यासह कुडचडे व इतर भागातही प्रचार दौऱ्यात भाग घेतला. पालिका व पंचायत पातळीवरील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधताना यावेळेला भाजपलाच निवडून आणण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. फोंडा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच इतर नगरसेवक भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्‍वनाथ दळवी आणि भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Ravi Naik
UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आपण निवडून आल्यावर सर्वप्रथम विकासाची कामे हाती घेणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वावरेन अशी ग्वाही दिली आहे. एकंदरित फोंडा मतदारसंघाबरोबरच दक्षिण गोव्यातील इतर मतदारसंघातही भाजपला चांगले मतदान होईल, असा विश्‍वास कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com