Sky Lantern Competition : आकाशकंदील स्पर्धेत संतोषी शेटगांवकर प्रथम

Sky Lantern Competition : स्पर्धेत एकूण चौदा स्पर्धक सहभागी झाले होते.
Sky Lantern Competition
Sky Lantern Competition Dainik Gomantak

Sky Lantern Competition : मोरजी, मांद्रे येथील स्वरगंधा संस्थेने दीपावलीनिमित्त आयोजित पेडणे तालुकास्तरीय आकाशकंदील स्पर्धेत संतोषी शेटगांवकर (मोरजी) हिने पाच हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले.

द्वितीय बक्षीस चार हजार रुपये विवेक गावडे (कोरगाव), तृतीय बक्षीस तीन हजार रुपये यतीन शेट्ये (पेडणे) यांना प्राप्त झाले.

प्रत्येकी एक हजार रुपयांची चार उत्तेजनार्थ बक्षीसे अथर्व सावळदेसाई (पेडणे), विनायक मावळणकर (मोपा), सुचिता मळीक( हंसापुर) व सिद्धांत शेट्ये ( मोरजी) यांना प्राप्त झाली. स्पर्धेत एकूण चौदा स्पर्धक सहभागी झाले होते.

Sky Lantern Competition
Pernem Container Accident: गुरांना वाचवण्याच्या नादात मासळीवाहू कंटेनरचा अपघात!

बक्षीस वितरण समारंभाला मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत, संस्थेच्या संगीता परब, सातेरी देवस्थान अध्यक्ष मकरंद पार्सेकर, परीक्षक वासुदेव शेट्ये व रीमा गावडे उपस्थित होते.

बक्षीसे ग्राम पंचायत मांद्रे व तुलसीदास सावंत यांनी पुरस्कृत केली होती. स्वागत व सूत्रसंचालन सोमनाथ पार्सेकर यांनी केले. प्रास्ताविक भाषण संगीता परब यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com