Sky Lantern Competition : आकाशकंदील स्‍पर्धेत आदर्श प्रथम

Sky Lantern Competition : आसगाव येथे आयोजन : साई दिगंबर मंडळातर्फे विविध स्‍पर्धा
Lantern Workshop
Lantern WorkshopDainik Gomantak

Sky Lantern Competition : पणजी, : आसगाव येथील श्री साई दिगंबर क्रीडा आणि सांकृतिक मंडळातर्फे ‘दिवाळी उत्सव : ३.०’ हा अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाअंतर्गत पाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात अखिल गोवा पातळीवर आकाशकंदील स्पर्धा, शिवोली मतदारसंघ मर्यादित १२ वर्षांवरील मुलांसाठी नृत्यस्पर्धा, आसगाव पंचायत मर्यादित महिलांसाठी अग्नी न वापरता पाककला स्पर्धा, आकाशकंदील स्पर्धा, पणती रंगविण्याच्‍या स्पर्धेचा समावेश होता.

राज्‍यस्‍तरीय आकाशकंदील स्पर्धेत प्रथम पारितोषिक आदर्श कोरगावकर (पीर्ण) यांना प्राप्‍त झाले. द्वितीय पारितोषिक पांडुरंग फडते तर तृतीय पारितोषिक गोकुळदास च्‍यारी (मुळगाव) यांना मिळाले. उत्तेजनार्थ बक्षिसे यतीन शेट्ये (पेडणे) व सदानंद खांडोळकर (मेरशी) यांना देण्यात आली.

आसगाव पंचायत मर्यादित आकाशकंदील स्पर्धेत प्रथम गौतम सारंग, द्वितीय संगम नार्वेकर, तृतीय तुप्ती सावंत तर उत्तेजनार्थ बक्षिसे अनुप खोर्जुवेकर व शौवरी नार्वेकर यांना प्राप्‍त झाली. पणती रंगविणे :

प्रथम निष्ठा सावंत, द्वितीय धनश्री च्‍यारी, तृतीय रिभा मांद्रेकर, चौथे पारितोषिक साईशा सावंत आणि पाचवे पारितोषिक शौवरी नार्वेकर हिला मिळाले. नृतिका आरोंदेकर आणि धनश्री कोनाडकर यांनी परीक्षक म्‍हणून काम पाहिले.

उद्‌घाटन समारंभाला शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, मंडळाचे अध्यक्ष साईश नार्वेकर, देवदत्त वडेर, गजानन नार्वेकर, चिंतामणी केळकर, सपना पेडणेकर, वैभवी पेडणेकर, पुनम केळकर यांची उपस्‍थिती होती. परीक्षक म्हणून विनायक नावेलकर व ओंकार शिरसाट यांनी काम पाहिले.

पाककला स्पर्धेत सिद्धाली अव्‍वल

अग्नी न वापरता पाककला स्पर्धेत प्रथम सिद्धाली गाड, द्वितीय निष्का हळदणकर, तृतीय रश्मी किट्टूकर यांना बक्षिसे मिळाली.

उत्क्रांती तोरस्कर व रुशाली शिरोडकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. एकेरी नृत्यस्पर्धेत तेजल वेर्णेकर, रुपल वेर्णेकर, काया लोटलीकर यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली. उत्तेजनार्थ बक्षिसे के. फडते व एल. पो यांना मिळाली. स्पर्धेचे परीक्षण एलविरा डिसोझा आणि अंजिता भगत यांनी केले. सूत्रसंचालन यश वडेर यांनी केले.

Lantern Workshop
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट, जाणून घ्या ताजे दर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com