Siolim Goa: सडये परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई होणार- दिलायला लोबो

Siolim Goa: सडये पंचायत क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून यापुढे कचरा टाकणाऱ्यावर कडक करवाई केली जाईल.
Siolim | Delilah Lobo
Siolim | Delilah LoboDainik Gomantak

Siolim Goa: सडये पंचायत क्षेत्रात घरोघरी नियमितपणे कचरा उचलला जात असतानाही काही लोक परिसात कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून यापुढे कचरा टाकणाऱ्यावर कडक करवाई केली जाईल, असे आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले.

ट्रोपावाडा-सडयें येथील प्राथमिक शाळा तसेच ख्रिस्ती स्मशानभूमीच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर आमदार लोबो बोलत होत्या. सरपंच दीपा पेडणेकर, उपसरपंच नीलेश वायंगणकर, पंचसदस्य सचिन मांद्रेकर, ओंकार हरमलकर, साहू ऊर्फ निशांत कळंगुटकर, शिला शिरोडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहित चोपडेकर उपस्थित होते.

Siolim | Delilah Lobo
Christmas Sweets In Goa: ख्रिसमसचा गोडवा वाढवणारे गोव्याचे स्पेशल खाद्यपदार्थ

पंचायत मंडळाकडून आमदार लोबो यांच्या सहकार्याने गावात कचरा गोळा करण्याबरोबरच कचरा छाननी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे बाहेरचा कचरा सडयेत कोणी टाकताना आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून दंड आकारल जाईल, त्याबरोबरच गावची स्वच्छताही करून घेतली जाईल, असा इशारा उपसरपंच नीलेश वायंगणकर यांनी यावेळी दिला. सरपंच दीपा पेडणेकर तसेच इतरांनी कचरा समस्येबाबत विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com