दैनिक गोमन्तक
ख्रिस्ती लोकं नाताळानिमित्त काही खास गोड पदार्थ आवर्जून बनवतात, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
काही पदार्थांमध्ये अंड्याचा वापर पण केला जातो.
बिबिन्का, दोदोल, करंज्या हे पदा्र्थ आवडीने बनवले जातात.
तसेच बाथ्क, दॉश, कोकाद, पिनाग, गॉस हे पदार्थ गोवेकरांच्या नाताळचा गोडवा वाढवतात.
आपल्या शेजारील कुटुंबियांना, आपल्या मित्रपरिवाराला गोडपदार्थ दिले जातात.
या गोड पदार्थांचे वाटप नाताळाच्या आदल्या दिवशी केले जाते.
पुर्वी हे गोड पदार्थ चुलीवर बनवले जायचे आता ते शिगडीवर करण्याकडे लोकांचा भर असतो.