Goa Tourist : ‘मोपा’ सुरू झाल्यापासून दक्षिण गोव्यात पर्यटक संख्येत मोठी घट! व्‍हेन्‍झी व्‍हिएगस

Goa Tourist : किनारी भागातील पर्यटनावरही परिणाम; बाणावली किनारी भागाचा विचार करता रेस्टॉरंट्स व हॉटेल्समध्ये केवळ ४० टक्के टेबले आणि खोल्या भरलेली दिसतात.
Goa Tourist
Goa TouristDainik Gomantak

Goa Tourist :

मडगाव, मोपा विमानतळाला प्रारंभ झाल्‍यापासून दक्षिण गोव्‍यातील पर्यटनावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

दक्षिण गोव्यात पर्यटक पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. किनारी भागातील आमदार असल्याने आपणास याची कल्पना आली आहे. रेस्टॉरंट्समध्ये आठवड्याच्या अखेरीस पर्यटकांची गर्दी असायची, आता तशी स्थिती नाही, असा दावा बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केला आहे.

दाबोळी विमानतळावरील विमानसेवा वळवून ‘मोपा’वरून सुरू करण्याच्या प्रकाराचे दक्षिण गोव्यावरील विपरित परिणाम भविष्यात वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बाणावली किनारी भागाचा विचार करता रेस्टॉरंट्स व हॉटेल्समध्ये केवळ ४० टक्के टेबले आणि खोल्या भरलेली दिसतात.

दक्षिण गोव्यात याआधी उन्हाळ्यात पर्यटन हंगाम जोमात चालल्याचे दिसायचे. तसे आता दिसत नसून पर्यटकांची संख्या रोडावत आहे, असा दावा व्हिएगस यांनी केला आहे.

Goa Tourist
Panaji News : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी बाळगायला हवा : शिवाजी देसाई

दरवर्षी पर्यटकांच्या संख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही विमानतळ चालू राहण्यासांठी भाजप सरकार सत्तेतून बाहेर जाण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनी आगामी निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे, असे आमदार व्हिएगस यांनी म्हटले आहे.

‘दाबोळी’बाबत सरकार हमी देत नाही !

राज्य सरकार दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, असे सांगत असताना दाबोळी विमानतळावर कार्यरत विमान कंपन्यांकडून तेथील सेवा बंद करून मोपा विमानतळावरून सेवा सुरू केली जात आहे, याकडे व्हिएगस यांनी लक्ष वेधले. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, याची पक्की हमी राज्य सरकारकडून दिली जात नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com