Panaji News : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांनी बाळगायला हवा : शिवाजी देसाई

Panaji News : गोवा विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; अशा चारित्र्यसंपन्न धीरोदात्त छत्रपती शिवरायांचा आदर्श युवकांनी बाळगायला हवा असे प्रतिपादन ॲड. शिवाजी देसाई यांनी केले.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले. शिवाजी महाराजांच्या मनात रयतेविषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता होती.

त्यांनी सामान्यांकडून असामान्य गौरवशाली इतिहास घडवला. मोठमोठ्या संकटांना कधी शक्तीने तर कधी युक्तीने सामोरे गेले. अशा चारित्र्यसंपन्न धीरोदात्त छत्रपती शिवरायांचा आदर्श युवकांनी बाळगायला हवा असे प्रतिपादन ॲड. शिवाजी देसाई यांनी केले.

गोवा विद्यापीठात मराठी अध्ययन शाखेने आयोजित केलेल्या शिवजयंती समारोहात युवकांची प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा अधिष्ठाता प्रो. अनुराधा वागळे, मराठी अध्ययन शाखा संचालक प्रा. विनायक बापट, शिवजयंती समारोहाचे संयोजक डॉ. विनय मडगांवकर, समाजशास्त्र अध्ययन शाखा संचालक डॉ. अरविंद हळदणकर, इतिहास अध्ययन शाखा संचालक प्रा. विनोद काणकोणकर हे मान्यवर उपस्थित होते.

Panaji
Goa Petrol-Diesel Price: आठवड्याच्या सुरुवातीला असे आहेत गोव्यातील इंधनाचे दर; वाचा पेट्रोल-डिझेलच्या किमती

अधिष्ठाता प्रो. अनुराधा वागळे आणि परीक्षक डॉ. अरविंद हळदणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी अध्ययन शाखेची विद्यार्थिनी दिव्या बर्वे यांनी समर्थ रामदास विरचित ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या काव्याच्या सुश्राव्य सादरीकरणाने कार्यक्रमाला आरंभ झाला.

अधिष्ठाता प्रो. अनुराधा वागळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रा. विनायक बापट यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. विनय मडगांवकर यांनी प्रास्ताविक केले. ओमकार गोवेकर आणि वेदिका बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हेमंत अय्या यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत सायली गर्दे प्रथम

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून शिवजयंती प्रित्यर्थ गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘मला साहित्यातून भेटलेले छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.

त्यात गोवा विद्यापीठातील मराठीसह अन्य ज्ञान शाखांतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. या स्पर्धेत सायली गर्दे प्रथम, ओमकार गोवेकर द्वितीय तर कांती मायनीकर यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. समाजशास्त्र अध्ययन शाखा संचालक डॉ. अरविंद हळदणकर, इतिहास अध्ययन शाखा संचालक प्रा. विनोद काणकोणकर यांनी परीक्षण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com