Sanguem News : तेजस यांनी सांगेत साकारली ५० फुटी श्रीराम प्रतिमा; खाणमाती, भुकटीचा वापर

Sanguem News : २२ जानेवारीपर्यंत पाहण्यास खुली, कलेचे कौतुक
Shree Ram
Shree Ram Dainik Gomantak

Sanguem News : सांगे, अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे, या पार्श्वभूमीवर सांगे येथील अष्टपैलू कलाकार तेजस वडील यांनी आपल्या मित्रांचे सहकार्य घेऊन येथील पालिका सभागृहात खाणमाती व रांगोळीचा वापर करून पन्नास फूट उंच श्रीराम, राम मंदिर, डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिकृती रेखाटली आहे.

ही कलाकृती २२ जानेवारीपर्यंत खुली असणार आहे. दरम्यान, या कलाकृतीचा जागतिक विक्रमात नोंद व्हावी, यासाठी वडील यांनी पत्र व्यवहार केला आहे.

या कलाकृतीचे उद्‍घाटन जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर व नागराध्यक्षा अर्चना गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक इकबाल सय्यद, संगमेश्वर नाईक, उपनगराध्यक्ष केरोज क्रुज, सरपंच भारती नाईक व युनियन हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

Shree Ram
Goa Tourism: गोव्याला मागे टाकून अयोध्यानगरी ठरली अव्वल!

गुणी कलाकारांना प्रोत्साहन द्यावा

१ सुरेश केपेकर यांनी सांगितले की, सांगेसारख्या भागात चांगले कलाकार आहेत. जागतिक पातळीवर प्रदर्शन अशा गुणी कलाकाराला प्रोत्साहन मिळाल्यास सांगेचे नाव उज्ज्वल होणार आहे, असे ते म्हणाले.

२ उपनगराध्यक्ष केरोज क्रुज यांनी सांगेतील विद्यार्थ्यांनी ही कलाकृती पाहावी, असे आवाहन केले.

३ नगराध्यक्ष अर्चना गावकर यांनी कलाकार तेजस वडील यांचे अभिनंदन केले.

नैसर्गिक रंगांचा वापर

यावेळी तेजस वडील म्हणाले की, ही कलाकृती तयार करण्यासाठी आपल्याला दोन दिवस लागले. रांगोळीत रंग न वापरता माती, चिऱ्यांची भुकटी, खाणीतील काळी भुकटी, विटांची भुकटी अशा नैसर्गिक साहित्याचा वापर केला आहे.

या कामी आपल्याला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व सांगे नगरपालिकेने सहकार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com