Jeet Arolkar
Jeet ArolkarDainik Gomantak

मांद्रेत स्‍वतंत्र अग्‍निशामक केंद्र, पोलिस स्‍थानक हवे; आरोलकर यांची मागणी

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्‍या असणाऱ्या या मतदारसंघात स्‍वतंत्र पोलिस स्‍थानक आणि अग्‍निशामक दल उभारावे आशी आरोलकर यांची मागणी

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेला अर्थसंकल्‍प सर्वसामान्‍यांना दिलासा देणारे आहे. मांद्रे मतदारसंघातील विकासकामांसाठी तसेच पायाभूत सुविधा निर्माण केलेल्‍या तरतुदींचे स्‍वागत आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्‍या असणाऱ्या या मतदारसंघात स्‍वतंत्र पोलिस स्‍थानक आणि अग्‍निशामक दल उभारावे, अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केली. अर्थसंकल्‍पावरील चर्चेदरम्‍यान ते बोलत होते.

(should have an independent fire station, police station in mandrem Arolkar's demand)

Jeet Arolkar
काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी दिले मंत्रिपदाचेही आमिष

मांद्रे मतदारसंघ किनारी भागात येतो. त्‍यामुळे येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर येथील लोकवस्‍ती आणि व्‍यापार-उदिम वाढत आहे. या मतदारसंघात वीज, पाणीपुरवठा आणि रस्‍ते या प्रमुख समस्या असून मांद्रेत वीजउपकेंद्र उभारण्यासाठी केलेल्‍या आर्थिक तरतुदीचे मी स्‍वागत करतो. मांद्रेसाठी स्‍वतंत्र पोलिस स्‍थानक मंजूर झाले असून येथील पर्यटकांची वाढती संख्या पाहता पोलिसस्‍थानक लवकरात लवकर उभारावे, अशी सूचना आरोलकर यांनी केली.

पेडणे तालुक्‍यातील नियोजित प्रकल्‍पांसाठी ज्‍या लोकांच्या जमिनी गेलेल्‍या आहेत, त्‍यातील काहींना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. सरकारने या लोकांचे पैसे तातडीने द्यावेत. तसेच ज्‍यांची जमीन घेतली आहे, त्‍या कुटुंबातील एकास संबंधित प्रकल्‍पात नोकरी द्यावी, अशी मागणी आरोलकर यांनी केली. तुये इलेक्‍ट्रॉनिक सिटीमुळेही स्‍थानिकांना नोकऱ्या उपलब्‍ध होतील. हा प्रकल्‍प शक्‍य तितक्या लवकर मार्गी लावावा, असे ते म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com