Goa News : निराधार महिलेला हक्काचा आश्रय; सभापती रमेश तवडकर यांनी दिली ग्वाही

Goa News : यावेळी त्यांच्यासोबत सावर्डे मतदारसंघाचे आमदार अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, स्थानिक पंच संजना नार्वेकर, गौतम सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Goa
GoaDainik Gomantak

Goa News :

तांबडीसुर्ला, श्रम धाम उपक्रमांतर्गत निराधार, असाहाय्य महिलांना नवीन घरकुल बांधून देण्यात येते. या उपक्रमातून धारगे-साकोर्डा येथील तृप्ती गावकर या निराधार महिलेला महिन्याभरात नवीन घर बांधून देणार असून कामाचा प्रारंभ लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन सभापती रमेश तवडकर यांनी धारगे-साकोर्डा येथे दिले.

यावेळी त्यांच्यासोबत सावर्डे मतदारसंघाचे आमदार अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, स्थानिक पंच संजना नार्वेकर, गौतम सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

तृप्ती गावकर यांच्या मातीच्या जुन्या घराची भिंत पावसाळ्यात २७ जुलै रोजी कोसळली होती. त्यामुळे तृप्ती गावकर आणि त्यांची दोन मुले बेघर झाली होती.

Goa
Goa Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना घर उभारणे शक्य नसल्याने त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. दैनिक ‘गोमन्तक’ने या घटनेचे २८ जुलै रोजी सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com