‘लोबो दाम्पत्याची सतावणूक कराल तर रस्त्यावर उतरू’

मंत्री विश्वजीत राणे यांचा शिवोली मार्ना पंचायतीच्या मावळत्या सरपंच शर्मिला वेर्णेकर यांनी निषेध केला.
Michel Lobo and Delilah Lobo Latest News
Michel Lobo and Delilah Lobo Latest NewsDainik Gomantak

कळंगुट : विधाधसभेचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो तसेच त्यांच्या पत्नी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांना त्यांच्या व्यवसायावरून विनाकारण सतावणूक सुरू केल्यासंदर्भात मंत्री विश्वजीत राणे यांचा शिवोली मार्ना पंचायतीच्या मावळत्या सरपंच शर्मिला वेर्णेकर यांनी निषेध केला.

Michel Lobo and Delilah Lobo Latest News
अधिवेशनात पोगो विधेयक मांडणारः वीरेश बोरकर

वेळप्रसंगी लोबो दांम्पत्याच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. अन्न व औषधे विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढे करीत स्वार्थी हेतूने लोबो दांपत्याच्या किनारी भागातील रेस्टॉरंट्सवर छापा टाकण्याचे सत्र सध्या मंत्री राणे यांनी चालवले असून या गोष्टीचा शिवोली मतदारसंघातील जनता निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

राणें यांनी आपले राजकारण जरूर करावे, परंतु कुणाच्या पोटावर मारण्याचा प्रकार करू नये, असे शिवोलीच्या माजी सरपंच मोनाली आगरवाडेकर यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलतांना सांगितले.

मंत्री राणे यांनी लोबो दांम्पत्याच्या कुरापती काढण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील बेकायदा डोंगर कापणी थांबवावी व नंतरच इतरांच्या वैयक्तिक व्यवसायाकडे वळावे, असे शिवोली काँग्रेस गट समितीच्या माजी अध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com