Savoi Verem : प्रियोळमधील रस्त्याचे काम सुरू; २ कोटी ७१ लाखांचा खर्च

Savoi Verem : अशावेळी समोरासमोर वाहने अचानक आल्यास अपघाताची शक्यता निर्माण होत होती. हे वळण सध्या रुंद करण्याचे काम सुरू आहे.
Savoi Verem
Savoi Verem Dainik Gomantak

Savoi Verem :

सावईवेरे, प्रियोळ मतदारसंघातील सावईवेरे-भूतखांब-आर्ल-केरी ते पिसगाळ-प्रियोळपर्यंतच्या सुमारे १० किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम जोरात सुरू असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कामासाठी आमदार गोविंद गावडे यांच्या प्रयत्नांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे २ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

वरील रस्त्याचे ठिकठिकाणी डांबरीकरण उखडल्यामुळे या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून लहान-मोठे खड्डे पडले होते. परिणामी या रस्त्यावर अपघातही घडले होते. वाहनचालकांना हे खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.

Savoi Verem
Vasco Crime: खूनाचे गूढ उलगडेना! वास्को पोलिसांसमोर उभे ठाकले मोठे आव्हान

शिवाय आर्ल-भूतखांब रस्त्यावर ‘यू’ आकाराचे वळण असून या वळणावरील एका बाजूस बरेच खड्डे होते. अशावेळी समोरासमोर वाहने अचानक आल्यास अपघाताची शक्यता निर्माण होत होती. हे वळण सध्या रुंद करण्याचे काम सुरू आहे.

वाहनचालकांची मागणी पूर्ण

संभाव्य अपघात घडण्यापूर्वी या रस्त्याचे व्यवस्थितपणे दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी वाहनचालक करीत होते. या भागाचे स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन या रस्त्याच्या रुंदीकरण तसेच हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करून लगेच या कामाला प्रारंभ झाला होता. हा रस्ता बराच रुंद करण्यात आला असून सध्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com