Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

Smart City Road : या मार्गावरील इतर ठिकाणचे क्रॉस हटवून रस्त्याच्या बाजूला सरकारी जागेत उभारले गेले आहेत. पण हा क्रॉस कुठे उभारावा, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.
Smart City Road
Smart City Road Dainik Gomantak

Smart City Road :

पणजी सांतिनेजमधील काँक्रीटीकरण रस्त्याचे काम आता १५ ते २० टक्के बाकी राहिले आहे, तर मेनहोलचे काम पूर्ण होत आले आहे. दुसरीकडे काकुलो मॉल ते मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्पापर्यंतची सुमारे ३०० मीटरची भूमिगत एक मीटर व्यासाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

तेथील एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी चिन्हे होती. परंतु वेलनेस फार्मसीसमोरील चौकात गटारासाठी अडथळा ठरणारे बांधकाम हटविले जात नाही. त्यामुळे काँक्रीटीकरण रस्ता करण्यात अडथळा येत आहे.

हॉटेल ‘शीतल’जवळ अतिक्रमित बांधकाम रस्त्याच्या बाजूच्या गटाराला अडथळा ठरत आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने सरकारी पातळीवर निर्णय घेण्यात अडथळे येत असल्याचे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Smart City Road
Goa Murder Case: पर्यटनाला वास्‍कोत आले, चोरीसाठी वृद्धेला ठार केले; 26 दिवसांनंतर आंध्रातील दोघांना अटक

तोपर्यंत रस्त्यावर काँक्रीट टाकणे कठीण

‘शीतल’ हॉटेल ते काकुलो मॉल चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्या रस्त्याच्या कामालाही ‘शीतल’ हॉटेल जवळील गटाराचा अडथळा आहे. या गटाराचे काम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर काँक्रीट टाकणे कंत्राटदाराला कठीण बनले आहे.

‘विवांता’ हॉटेल चौकातील क्रॉस ठरतोय अडथळा

‘विवांता’ हॉटेलच्या चौकात क्रॉस आहे. तो रस्त्याच्या पदपथाला अडथळा ठरत आहे. त्‍यामुळे हा क्रॉस हटविण्याविषयी स्मार्ट सिटी विकास लिमीटेडपुढे प्रश्न निमार्ण झाला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या सोसायटीधारकांनी त्यास परवानगी दिली नाही.

क्रॉस कोणाच्याही इतर खासगी जागेत किंवा सरकारी जागेत उभारावा अशी सूचना त्यांनी स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांना केली. या मार्गावरील इतर ठिकाणचे क्रॉस हटवून रस्त्याच्या बाजूला सरकारी जागेत उभारले गेले आहेत. पण हा क्रॉस कुठे उभारावा, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.

हॉटेल ‘शीतल’ ते काकुलो मॉल या मार्गाचे काँक्रीटीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पदपथ निर्मितीच्या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढे सांतिनेज रस्त्याला हा मार्ग जोडेपर्यंत तयार झालेला मार्गच येथील रहिवाशांना वापरता येणार आहे. ‘वेलनेस’ फार्मसीसमोर सुरू असलेले काम.

खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

१ सांतिनेज परिसरात काँक्रीटचा रस्ता आणि मुख्य मलनि:स्सारण वाहिनी टाकण्याचे काम खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मेनहोलसाठी खोदकाम केल्यानंतर रस्ते खचणे आणि पावसाचा अडथळा होय. भुसभुशीत माती असल्याने खोदकाम केलेल्या ठिकाणी बांधकाम करणे अवघड होते.

२ शिवाय चार-पाच मीटर खोल खोदल्यावर पाणी लागत होते. त्यामुळे साचलेले पाणी उसपून काँक्रीट टाकून त्यावर मेनहोलची उभारणी करण्याचे काम करावे लागले. ज्या तारखेपर्यंत हे काम होईल अशी अपेक्षा होती, त्या तारखेपेक्षा अधिक काळ कामाला लागला.

गटारव्यवस्थेसाठी समिती, कामे वेळेत करणार का?

पणजी शहरातील गटारव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी आयपीएससीडीएलने समिती नेमली आहे. ही समिती गटारव्यवस्थेवर लक्ष ठेवण्‍याबरोबरच सूचनाही करणार आहे. शहरात पाणी साचू नये, पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, गटारांची देखभाल, दुरुस्ती वेळेत करणे अशी कामे करण्याविषयी ही समिती काम करणार आहे.

‘आयपीएससीडीएल’ माध्‍यमातून कामे

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (आयपीएससीडीएल) या मुख्य संस्थेच्या माध्यमातून कामांची अंमलबजावणी सुरू आहे. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, नगरविकास खाते, जलस्रोत खाते, कचरा व्यवस्थापन अशा विविध सरकारी खात्यांच्या सहकार्याने कामे सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com