Sanquelim News: साखळीत केबलिंगचे काम रोखले; नगरसेवक संतप्त

Sanquelim News: वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने नाराजी
Sanquelim News
Sanquelim News Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim News: देसाईनगर साखळी येथे भूमिगत वीजवाहिनीचे काम करत असताना वारंवार फुटत असलेल्या जलवाहिनीमुळे लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत.

या प्रकारावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संतप्त नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी भूमिगत वीज वाहिनीचे काम बंद पाडले. खोदलेले रस्ते पूर्वपदावर आणण्यास कंत्राटदारास भाग पाडत रस्त्याच्या बाजूला लावलेले ड्रिलींग मशीन व टँकर हटविण्यास सांगितले.

या कामासंदर्भात योग्य दिशा ठरविण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, वीज खात्याचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करा.

या कामात जलवाहिन्या फुटणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी हमी द्या व नंतरच काम सुरू करा, असा कडक पवित्रा नगरसेवक ब्लेगन यांनी घेतला आहे.

साखळीतील देसाईनगर व इतर भागांमध्ये सध्या या भूमिगत वीजवाहिनीचे काम जोरदारपणे सुरू आहे. या कामामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. देसाईनगर भागात आतापर्यंत पाचवेळा या कामामुळे जलवाहिनी फुटून लोकांचे हाल झाले.

तसेच लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. गुरूवारी २२ रोजी पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे भागातील पाणीपुरवठा बंद झाला होता.

Sanquelim News
Mumbai-Goa Highway: गोव्यात येणाऱ्यांवर ‘टोल’धाड

१ जानेवारीपर्यंत काम बंद ची सूचना

वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने देसाईनगर भागातील काम येणाऱ्या १ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याची सूचना नगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे,असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन काम सुरू करू. तोवर काम बंद राहिल, असे देसाई यांनी सांगितले.

भूमिगत वीजवाहिनीची आजच गरज नाही. हे काम करताना पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणा बरोबर घेऊनच काम करावे. जलवाहिनी फुटणारच नाही, याची काळजी घ्या. कामाचे योग्य नियोजन करा.

- प्रवीण ब्लेगन, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com