गोव्यातील G20चे देखणे, प्रभावी आयोजन : शेर्पा अमिताभ कांत

वैविध्यपूर्ण संस्कृती, आदरातिथ्याद्वारे झाले प्रभावित; संस्मरणीय आठवणी
 SAI20 Summit in Goa
SAI20 Summit in GoaDainik Gomantak

गोवा प्रदेश भव्यदिव्य आदरातिथ्यासाठी लोकप्रिय आहेच, त्याचबरोबर उपक्रमांच्या चोख, यशस्वी व प्रभावी आयोजनातही उत्तम आहे. जी२०च्या निमंत्रित प्रतिनिधींसाठी गोवा शासनाद्वारे सादर करण्यात आलेली भेटही खरोखरच उत्कृष्ट आहे.

गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, अनोखा स्वाद, तसेच महान चित्रकलाकार मारिओ मिरांडा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी विकसित केलेल्या कलाकृतींसह खास बनवणाऱ्या कलाकृतींचा समावेश या भेटीमध्ये आहे. जी20च्या प्रतिनिधींसाठी आयुष्यभर या आठवणी संस्मरणीय ठरणार आहेत, असे प्रशंसोद्‌गार जी20साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी काढले.

भारताची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आणि वारसा यांचे प्रभावी दर्शन घडवल्याबद्दल एसएआय२० शिखर परिषदेसाठी गोव्यात आलेले जी२०साठीचे भारतीय शेर्पा अमिताभ कांत यांनी गोवा सरकारचे कौतुक केले.

 SAI20 Summit in Goa
सगळे गोव्याला फिरायला गेले अन् चोरट्याने डाव साधला, घरातून 3400 डॉलर आणि पिस्तूल चोरी

ते म्हणाले, की या बैठकस्थळी संपूर्ण भारतातील पारंपरिक कारागिरांचे वैशिष्ट्य, वैविध्यता सादर करण्यात आली आणि याद्वारे केवळ गोव्याचाच नाही तर संपूर्ण देशातील वैविध्यतेचा अनोखा अनुभव मिळाला.

जी२०च्या अधीकृत कार्यगटांपैकी एक असलेल्या सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स-२० (एसएआय२०) कार्यगटाची एसएआय२० ही बैठक आहे. भारताच्या जी२० अध्यक्षतेखाली बैठकांचा एक भाग म्हणून एसएआय२० शिखर परिषदेची बैठक १२ जून २०२३ रोजी गोव्यात सुरू झाली आहे.

गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, त्याचे वैविध्यपूर्ण रंग, चव, पाककृती, येथील हातमाग व हस्तकला उत्पादने यामुळे गोवा हे पर्यटनासाठी जागतिक दर्जाचे ठिकाण बनले आहे. मी गोव्यात अशा प्रकारच्या आणखी बैठकांचे आयोजन करण्याची वाट पाहत आहे. या बैठकांच्या माध्यमातून गोव्यासाठी जगासमोर प्रचार आणि प्रसार करण्याची एक अनोखी संधी असेल.

- अमिताभ कांत, जी२०साठीचे भारताचे शेर्पा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com