Sanguem Theft Case : सांगे चोरीप्रकरण क्राईम ब्रँचकडे द्या! मॅशू डिकॉस्ता

Sanguem Theft Case : शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा चालू स्थितीत आहेत की नाहीत, याची तपासणी शासनाने करणे आवश्यक आहे. या चोरीच्या तपासकार्यात सांगे पोलिसांना अपयश आले असून आता हा तपास क्राईम ब्रँचकडे दिल्यास नक्कीच सांगेवासीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा डिकॉस्ता यांनी व्यक्त केली आहे.
Sanguem Theft Case
Sanguem Theft Case Dainik Gomantak

Sanguem Theft Case :

सांगेतील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानात चोरी होऊन १५ दिवस उलटले, तरी अद्याप पोलिसांना चोरांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने हा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपविण्याची मागणी सांगेचे नगरसेवक मॅशू डिकॉस्ता यांनी पत्रकार परिषदेत केली.

चोरांना पकडण्यात नव्हे, तर दुचाकी, चारचाकी वाहनांना चलन देण्यात सांगे पोलिसांना राज्यात पहिले बक्षीस मिळू शकते. एकेकाळी सांगे पोलिस स्थानकाला देशात पाचवा क्रमांक मिळाला होता. मात्र, आता या पोलिस स्थानकाने हा ठसा पुसून टाकला असून या पोलिस अधिकाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे, ते गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तपासून पाहावे.

कारण इतर ठिकाणचे पोलिस चोरी झाल्यास अवघ्या काही तासांत चोरांना पकडतात; पण सांगेत १५ दिवस उलटूनही चोरांचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने चोर अन्य धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

Sanguem Theft Case
Goa Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर गोव्यातील हॉटेलमध्‍ये लैंगिक अत्याचार, एकाला अटक

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा चालू स्थितीत आहेत की नाहीत, याची तपासणी शासनाने करणे आवश्यक आहे. या चोरीच्या तपासकार्यात सांगे पोलिसांना अपयश आले असून आता हा तपास क्राईम ब्रँचकडे दिल्यास नक्कीच सांगेवासीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा डिकॉस्ता यांनी व्यक्त केली आहे.

चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, तरीही...

सांगे पोलिस स्थानकाच्या अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर हे विठ्ठल-रखुमाई मंदिर असून सभोवताली लोकवस्ती आहे. इतकेच नव्हे, तर दहा मिनिटे अगोदर पोलिस त्या मंदिर परिसरात जाऊन येतात आणि पोलिसांची पाठ फिरताच चोर मंदिर फोडून गर्भगृहातील चांदीची प्रभावळ चोरून नेतात. ते दृश्‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही सांगे पोलिस चोरांचा माग काढू शकत नाहीत, हे मोठे अपयश असल्याचे डिकॉस्ता यांनी नमूद केले.

रात्रीची गस्त बंद

यापूर्वी सांगे पोलिस रात्री गस्त घालताना नियमितपणे लांबलचक व्हिसल वाजवत असल्यामुळे चोरांवर पोलिसांची दहशत होती. पोलिस गस्त घालत असल्यामुळे नागरिक बिनधास्तपणे झोप घेत होते. हा प्रकार आता बंद झाला असून रात्रीची गस्त बंद आहे, याची नोंद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही डिकॉस्ता म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com