Sanguem News : राज्यात नेत्रपेढीची गरज : किशोर सारसोलकर

Sanguem News : नेत्रशिबिरास प्रतिसाद
Sanguem
Sanguem Dainik Gomantak

Sanguem News : सांगे, आता मृत्यूनंतर सर्व अवयव दान करता येतात. पण इच्छा असूनही नेत्रदान करण्यासाठी राज्यात नेत्रपेढी उपलब्ध नसल्याने दुसऱ्याला दृष्टी देण्याचे चांगले कार्य करता येत नाही.

सरकारने याचा विचार करून राज्यात नेत्रपेढी वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी मुक्ता ऑप्टिशियन्सचे मालक किशोर सारसोलकर यांनी केले.

ते वेर्ले नेत्रावळी येथे सांगे गोमंतक मराठा समाजाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र शिबीर प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, पंचायत अशोक गावकर, समाजाचे अध्यक्ष रणजित नाईक उपस्थित होते.

अध्यक्ष रणजित नाईक म्हणाले, सांगे गोमंतक मराठा समाज आपल्या समाज बांधवांच्या हितासाठी अनेक उपक्रम, कार्यक्रम राबवित असतात.

आज जो मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचा एकूण ८५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक नाईक यांनी तर सूत्रसंचालन गणपत देविदास यांनी आणि विनोद देविदास यांनी आभार व्यक्त केले.

Sanguem
Goa Accident Case: पर्वरी आणि वेर्णा येथे अपघात; अपघातांची मालिका सुरुच

मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार : तेंडुलकर

विनय तेंडुलकर म्हणाले, की राज्यात नेत्रपेढीची अत्यंत आवश्यकता आहे. यासंदर्भात, मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून राज्यात नेत्रपेढी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी व्यवस्था उपलब्ध झाल्यास अनेकांनी आपले नेत्रदान करणे सोपे होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com