Sanguem News : नेत्रावळीत धुळीचे साम्राज्य; खोदकामामुळे रस्त्यावर खड्डे

Sanguem News : भूमिगत वीजवाहिन्या हे खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराने धुळीबाबत उपाययोजना करावी, यासाठी स्थानिक पंचायतीने पुढाकार घ्यावा, असे मत नागरिक दयानंद नाईक यांनी व्यक्त केले.
Sanguem
SanguemDainik Gomantak

Sanguem News : सांगे, नेत्रावळीत भूमिगत वीजवाहिन्या जोडण्याचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून मुख्य रस्त्यालगतची व्यापारी आस्थापने, बॅंका, घरादारांवर धुळीचे थर साचू लागल्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

हे खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराने धुळीबाबत उपाययोजना करावी, यासाठी स्थानिक पंचायतीने पुढाकार घ्यावा, असे मत नागरिक दयानंद नाईक यांनी व्यक्त केले.

गावात होणाऱ्या विकासकामांचे नेत्रावळीवासी नक्कीच स्वागत करीत आहेत; पण विकासकामे करीत असताना सामान्य नागरिकांना होणारा त्रासही लक्षात घेणे आवश्यक आहे. मुख्य रस्ता खोदल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून धुळीवर पाणी मारून नागरिकांना होणारा त्रास कमी करता येणे शक्य आहे.

शिवाय खोदकाम केल्यानंतर वाहन चालकांना होणारा खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी तात्पुरते कॉंक्रिट घालणे आवश्यक असताना नेत्रावळीत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नेत्रावळी-तिस्क हा ग्रामीण भागातला लहानसा बाजार भाग असल्यामुळे येथे दिवसभर लोकांची वर्दळ असते. शिवाय जवळच पंचायत कार्यालय, बॅंक असल्यामुळे लोक कामानिमित्त ये-जा करीत असतात. तसेच वाहनांची संख्याही वाढली आहे.

Sanguem
Goa Assembly: विरोधक एकवटले, विधानसभेत राम मंदिर प्रतिष्ठापना दिवसाच्या सुट्टीचा प्रस्ताव रद्द

पर्यटकांचेही हाल

नेत्रावळीत यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या वाढली असून या धुळीचा त्रास त्यांनाही होत आहे. शिवाय सतत होणाऱ्या वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांसह बसगाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या धुळीचा उपद्रव सहन करावा लागत आहे.

व्यापारी लोक तर नेहमीच्या धुळीमुळे पुरते वैतागून गेले आहे. पंचायतीने संबंधित कंत्राटदाराला समज देऊन धुळीवर उपाययोजना करण्याची मागणी दयानंद नाईक यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com