Sanguem News : समाजकार्यातील चीड राजकारणात नको : गोविंद गावडे

Sanguem News : धनगरवाड-कुर्डी येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
Sanguem
SanguemDainik Gomantak

Sanguem News : सांगे, राजकारण आणि समाजकारण वेगळे असले तरी समाजकार्यातील चीड राजकारणात निर्माण होता कामा नये. धनगर समाजाला अनुसूचित समाजात समाविष्ट केले जावे ही आपली पूर्वीपासूनचीं मागणी आहे.

प्रयत्न चालूच ठेवा, यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

धनगरवाडा, वाडे-कुर्डी येथे ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्‍यात प्रमुख पाहुणे म्हणून गावडे बोलत होते.

यावेळी समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सरपंच प्रज्योत गावकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालिका दीपाली नाईक, स्वयंपूर्ण मित्र सविता देसाई, विविध पंचायतींचे सरपंच, पंच उपस्‍थित होते.

लवकरच वाडे-कुर्डी पंचायत इमारत उभारणार

सामाजिक सभागृह गावागावांत निर्माण झाल्यास सामाजिक विचारमंथन करण्यासाठी उपयोगी केंद्र बनू शकते. या सभागृहाच्या जवळपास अंगणवाडी उभारण्यास आमचा प्रयत्न मार्गी लागला असल्यामुळे या वास्तूची शोभा अधिक वाढली जाईल. साडेतीन कोटी रुपये खर्चून वाडे-कुर्डी पंचायत इमारत उभारली जाणार आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Sanguem
Goa BJP: जनतेसह कार्यकर्त्यांच्या मनातील चेहर्‍यालाच भाजपाची उत्तरेतील उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

सरकारच्‍या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्‍येक समाजाने पुढे येण्यासाठी प्रयत्न करावा. धनगर बांधवांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्याचा वापर समाजप्रबोधनासाठी व्हावा.

- गोविंद गावडे, कला-संस्‍कृतीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com