Salcete National Highway : राष्ट्रीय महामार्गालगतची धोकादायक झाडे हटविणार ; अपघातानंतर प्रशासनाला जाग

गेल्या आठवड्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीत अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक झाली.
Salcete National Highway
Salcete National Highway Dainik Gomantak

Salcete National Highway : सासष्टी,काही दिवसांपूर्वी नावेली येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालविणाऱ्या महिलेवर झाड पडल्याने तिचे निधन झाले होते. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीत अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक झाली.

त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक तुकडी निवडण्यात आली. ही झाडे सर्वेक्षणानंतर हटवण्यात येणार आहेत.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपालिका, विविध पंचायतींचे सदस्य, वन खाते, अग्निशमन दल, मामलेदार कचेरीतील अधिकारीही उपस्थित होते.

या बैठकीला उपस्थित असलेले कॉंग्रेस पक्षाचे सावियो डिसिल्वा, एवर्सन वालेस, मोरेनो रिबेलो यांनीही जिल्हाधिकाऱ्यांने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्यासाठी जी समिती निवडली आहे, तिचे नेतृत्व जिल्हाधिकारी कचेरीतील अधिकारी करतील. समितीतील अधिकारी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करतील.

Salcete National Highway
Goa PWD: गोव्यात अद्यापही 80 ते 100 एमएलडी शुद्ध पाण्याची कमतरता; पुढील वर्षात राज्य होणार स्वयंपूर्ण

१०४ झाडांवर टांगती तलवार

सध्या राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील १०४ झाडे धोकादायक स्थितीत आहेत. ती लवकरच कापली जाती, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांनी सांगितले.

ग्रामीण भागातही अशा प्रकारे सर्वेक्षण केले जाईल. तसेच नंतर धोकादायक झाडे कापली जातील. त्यासाठी पंचायतीला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com