River Pollution : गणेशोत्सवातील निर्माल्य शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मिती : ‘म्हापसा रोटरॅक्ट’चा उपक्रम
River pollution
River pollutionDainik Gomantak

योगेश मिराशी

River Pollution : म्हापसा, नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी गणेशोत्सव काळातील निर्माल्य नदीपात्रात टाकू नये यासाठी म्हापसा रोटरॅक्ट क्लब गेल्या वर्षापासून जागृती केली जाते.

याच धर्तीवर म्हापसा रोटरॅक्ट क्लबने हरित गणेश गोवा मोहिमेंतर्गत निर्माल्य कलश विविध विसर्जनस्थळी भक्तांसाठी उपलब्ध केले होते.

या निर्माल्यापासून खत तयार केले जाते, जे नंतर शेतकऱ्यांमध्ये वापट केले जाते. यावर्षी जवळपास १,१०० किलो निर्माल्य जमा झाले आहे.

गणेशोत्सव काळात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश पूजनस्थळी दररोज बाप्पाला फुले, पाने, दुर्वा, वस्त्र, फुलांचे हार अर्पण केले जातात. यातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. अनेकदा हे निर्माल्य नदीपात्रात किंवा वाहत्या पाण्यात फेकले जाते.

यातून नैसर्गिक स्रोतांच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. असे प्रकार टाळण्यासाठी म्हापसा रोटरॅक्ट क्लबने पुढाकार घेत विसर्जनस्थळी निर्माल्य कलशाची व्यवस्था भक्तगणांसाठी केली होती.

अशा विसर्जित विघटन निर्माल्यातून गोळा झालेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून खत तयार करण्यात येते व नंतर ते मातीच्या संगोपनासाठी वापरण्यासाठी क्लबतर्फे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते. गेल्यावर्षी निर्माल्यातून क्लबने ९० किलो खताची निर्मिती केली होती.

River pollution
Goa Casino Raid: ईडीची कारवाई सीसी टीव्ही फुटेज तसेच दस्तावेज ताब्यात

जनजागृतीचा हेतू

म्हापसा रोटरॅक्ट क्लब व म्हापसा नगरपालिकेच्या साहाय्याने या निर्माल्य कलशाची व्यवस्था विसर्जनस्थळी केली होती. म्हापसा नदीवरील तारीर, आकय तसेच कुचेली येथे हे निर्माल्य कलश ठेवले होते.

नैसर्गिक अर्पणाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच, फुले व इतर वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांमधून नद्यांमध्ये फेकण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी क्लबचा हा उपक्रम होता.

यावर्षी १,१०० किलो निर्माल्य गोळा

यंदा विसर्जनस्थळावरून सुमारे १,१०० किलो निर्माल्य गोळा झाले होते. यात प्लास्टिकचा समावेश असतो. या निर्माल्याचे वर्गीकरण सध्या झाले असून, खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. जवळपास दोन महिने हे खत तयार होण्यास लागतात.

त्यानंतर, हे खत शेतकऱ्यांमध्ये वाटप केले जाईल. यंदाही ९० ते १०० किलो खतनिर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचे क्लबचे मयंक कारापूरकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com