Agriculture News : नावेली परिसरात पिकले विक्रमी भात ; फादर जॉर्ज क्वाद्रोस, इतरांचे सहकार्य

क्वाद्रोस यांच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्याचे फळ आता मिळू लागले आहे.
record rice grown in naveli premises
record rice grown in naveli premisesDainik Gomantak

Agriculture News : सासष्टी, नावेली येथील सालपे तळी परिसरातील शेतात चार दशकांनंतर लागवड केलेल्या भात शेतीत यंदा विक्रमी पीक आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी याचे श्रेय पॅडीमॅन फादर जॉर्ज क्वाद्रोस यांना देतात. हे पीक कापणीसाठी तयार आहे.

कित्येक वर्षांपासून ही शेतजमीन पडीक होती. नावेली ग्राम विकास समिती व नावेली जैवविविधता व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन फा. क्वाद्रोस यांच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्याचे फळ आता मिळू लागले आहे.

ही शेत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी नावेलीतील शेतकरी, कृषी खाते, डॉन बॉस्को लोटली सोसायटी, यांत्रिक शेती सेवा प्रदाता गोंयचो शेतकार यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ट्रॅक्टर्स, ट्रान्झप्लांटर्स, ड्रोन्स व हारवेस्टर्सची सेवा प्रदान केली.

जवळ जवळ एक तृतीयांश परिसरात ४.५ टन एवढे भात पिकलेले आहे, असे फा. जॉर्ज क्वाद्रोस यांनी सांगितले. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यंदा शेतकऱ्यांना फायदा होणार.

record rice grown in naveli premises
Goa Police : भाडेकरू पडताळणी थंडावली ; छाननीत पोलिसांना अडचणी

पुढील २५ दिवसांत दुसऱ्यांदा लागवड केली जाईल, अशी माहिती फा. जॉर्ज क्वाद्रोस यांनी दिली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी भातापासून तयार झालेला तांदूळ न विकण्याचा निर्णय घेतला आहे. ते हा तांदूळ स्वतःसाठी वापरणार आहेत.

यंदा यांत्रिकी पद्धतीने लागवड केल्याने शेतकऱ्यांवर शेतात उतरण्याची वेळ आली नाही, अशी माहिती गोंयचो शेतकाराचे स्टॅनली फर्नांडिस यांनी दिली. नावेली ग्राम विकास समितीचे जुवांव सौझा याने सुद्धा समाधान व आनंद व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com