रेशन दुकानदार, ग्राहकांना मिळणार नवीन तांदूळसाठा

तांदळाच्या पोत्यात अळ्या सापडल्याने दुकानदार आक्रमक
Ration shopkeeper
Ration shopkeeperDainik Gomantak

मुरगाव आणि सासष्टी तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांना वाटलेल्या तांदळाच्या पोत्यात अळ्या सापडल्याने दुकानदार आक्रमक झाले आहेत. हा सडलेला तांदूळ परत करून त्याऐवजी नवीन तांदूळ आणण्यासाठी येणारा वाहतूक खर्च नागरी पुरवठा खात्याने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असले तरी नागरी पुरवठा खात्याकडून हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले नाही.

राज्यात सडलेल्या व अळ्या पडलेल्या तांदळाच्या गोणी स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित केल्याच्या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत नागरी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांसह सचिव तसेच संचालकांची बैठक घेतली. या प्रकरणाला जबाबदार असलेल्यांकडून स्पष्टीकरण घ्या व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. यापूर्वी तूरडाळ प्रकरण राज्यात गाजले होते.

त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी दक्षता खात्यामार्फत सुरू केली. त्याला १० महिने उलटले तरी त्याचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. त्यामुळे हे प्रकरणही चौकशीच्या नावाखाली सुरू राहील. पुढील कारवाई मात्र कधी होईल याचा नेम नाही, अशी चर्चा स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये सुरू आहे.

राज्याला दर महिन्यासाठी भारतीय अन्न महामंडळाकडून सुमारे ५ हजार मेट्रिक तांदूळ पुरवला जातो. हा तांदळाचा साठा राज्यातील विविध गोदामांमध्ये ठेवला जातो. नंतर तो स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित केला जातो. त्यामुळे काहीवेळा एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या धान्यसाठ्यातील काही पोत्यांमधील धान्य निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठ्ठाळी तसेच सासष्टीत सापडलेल्या सडलेल्या तांदळाबाबत तेथील गोदाम प्रमुखांकडून माहिती मागवली आहे.

Ration shopkeeper
Pickleball Tournaments 2023: गोव्यात 19 मे पासून राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा

गांधी हेन्रिक यांचे घुमजाव

मुरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सरचिटणीस गांधी हेन्रिक यांनी या अळ्या पडलेल्या तांदळाचा पर्दाफाश केला. अशाप्रकारच्या अनेक गोणी स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहचल्या आहेत. यासंदर्भात खात्याच्या निरीक्षकांनी संपर्क साधला असता, हेन्रिक यांनी घुमजाव केले आहे. याप्रकरणी आपली तक्रार नाही, असे त्यांनी सांगितल्याचे खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर म्हणाले.

जबाबदार खाते, की महामंडळ?

मुरगाव व सासष्टी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांपैकी सरासरी १० दुकानदारांना अळ्या पडलेल्या तांदळाच्या गोणी मिळाल्या आहेत. त्यामुळे तांदळात ही अळी खात्याच्या गोदामात असताना की महामंडळाकडून पुरवठा केला तेव्हा ती अगोदरच पडली होती, याबाबत भाष्य करता येणार नाही.

Ration shopkeeper
GMC : गोमेकॉत पदव्युत्तरसाठी 41 टक्के आरक्षण जाहीर

वाहने मागवली

नागरी पुरवठा खात्याने सडलेल्या तांदळाच्या गोणी स्वस्त धान्य दुकानातून परत नेण्यासाठी व त्याच्या बदल्यात चांगल्या तांदळाच्या गोणी देण्यासाठी काही वाहने भाडेपट्टीवर घेतली आहेत. या वाहतूक खर्चाची जबाबदारी खात्याने स्वीकारली आहे.

दीडशे पोती तांदूळ खराब

कुठ्ठाळ्ळी व सासष्टी येथील या दोनच गोदामांमध्ये सडलेल्या तांदळाच्या गोणी स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच निकृष्ट धान्यसाठा मिळाला, असे नाही. मात्र, किती गोणी सडलेल्या होत्या, याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, १५० च्या आसपास या गोणी असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.`

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com