Konkan Railway : कोकण रेल्वेचे रेल्वे कोच रेस्टॉरंट पुन्हा सुरू; पाच वर्षांपासून होते बंद

Konkan Railway : कोविड संसर्गामुळे व्यवसाय होता ठप्प
 Railway
Railway Dainik Gomantak

Konkan Railway :

फातोर्डा, रावणफोंड जंक्‍शन, मडगाव येथील कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मागील पाच वर्षांपासून बंद असलेले रेल्वे कोच रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. स्वानंद रेस्टॉरंट असे नामकरण करण्यात आले आहे .

रेल्‍वेच्‍या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार नव्याने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला पुढील ९ वर्षे कंत्राटानुसार हे रेस्टॉरंट चालविण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे .

मार्च २०१९ ला कोविड संसर्गाचे आगमन झाल्यानंतर देशभरात सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. त्यामुळे तत्कालीन कंत्राटदारावरही हे रेस्टॉरंट बंद ठेवण्याची पाळी आली होती. त्या काळापासून रेल्वे डब्यात असलेले हे रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते .

 Railway
Goa Beach : किनाऱ्यांची काळजी न घेतल्यास गावे धोक्यात ! पर्यावरण अभ्यासकांची भीती

या विषयी माहिती देताना कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाची लाट येण्यापूर्वी हे रेस्टॉरंट सुरु करण्याविषयी तत्कालीन कंत्राटदाराला सुचविण्यात आले होते.

मात्र त्याने रस दाखविला नाही. त्यानंतर कोविडमुळेही हे रेस्टॉरंट काही काळ बंद राहिले होते. हा संसर्ग ओसरल्यानंतरही त्याने हे रेस्टॉरंट सुरु केले नाही. अशाने त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले.

नऊ वर्षांसाठी कंत्राट

घाटगे यांनी सांगितले की, आता नव्या कंत्राटदाराची साडेसात लाख रुपये परवाना शुल्क भरून ९ वर्षासाठी या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यात दरवर्षी तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com