Quepem Panchayat : कुडचडे, केपे पालिका क्षेत्रांत पुराची भीती कायम

खबरदारीची उपाययोजना सुरू जागोजागीच्‍या खोदकामांमुळे पावसाळ्‍यात रस्ते तुंबण्‍याची शक्‍यता
Quepem
QuepemGomantak Digital Team

कुडचडे व केपे पालिका क्षेत्रात माॅन्‍सूनपूर्व कामांना वेग आला आहे. गेल्या वर्षी काही भागात पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. तशी यावेळी होऊ नये म्हणून या दोन्‍ही पालिका आपापल्‍या कामाला लागल्या आहेत.

कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्या व मलनि:स्सारण वाहिन्या टाकण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अंतर्गत तसेच मुख्य रस्ते खोदून ठेवण्‍यात आलेले आहेत. खोदकाम केलेली माती गटारांत टाकल्याने जास्तीत जास्त गटारे मातीने तुंबली आहेत. पालिकेचे कामगार ही माती गटारांतून काढण्याच्या कामाला लागले आहेत, असे नगराध्यक्षा जास्‍मिन ब्रागांझा यांनी सांगितले.

Quepem
Healthy Tips: 'या' पानांवर जेवण केल्यास अनेक गंभीर आजार राहतात दूर

खोदकामांमुळे यावर्षी पावसाळ्यात रस्ते तुंबतील अशी भीती लोकांनी व्‍यक्त केली आहे. दरवर्षी आंबेडकर चौकाजवळ पाणी साचते. यंदा खोदकाम व्‍यवस्‍थित न केल्याने पाण्याच्या वाट बंद झाल्या आहेत. त्‍यामुळे आंबेडकर चौकासह रेल्वे स्टेशनमार्ग तसेच कदंब बसस्थानकाच्या पाठीमागे पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.

Quepem
Bethoda Car Accident: बेतोडा येथे वीस मीटर खोल नाल्यात कोसळली कार, सर्व प्रवासी जखमी

केपेत गटारे उपसण्‍याचे काम सुरू

केपे पालिकेनेही माॅन्‍सूनपूर्व कामांना सुरूवात केली आहे. तेराही प्रभागांत गटार उपसण्याचे काम सुरू असल्याचे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी सांगितले. गेल्या वेळी काही ठिकाणी पाणी साचले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्‍यात आल्‍याचे त्यांनी सांगितले. सदर कामे पावसाळ्‍यापूर्वी पूर्ण करण्‍यात येतील, असेही त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com