Purple Fest 2024 : ‘पर्पल फेस्त’ 2024 नियोजनावर होणार चर्चा ; अमेरिकन रॅप गायक स्पर्श शहाची आज खास उपस्थिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई या बैठकीला मार्गदर्शन करणार असून अमेरिकन रॅपर तथा गायक स्पर्श शहा यांची या बैठकीला खास उपस्थिती असणार आहे.
Sparsh Shaha
Sparsh ShahaDainik Gomantak

Purple Fest : पणजी, सरकारचे समाज कल्याण खाते आणि दिव्यांगजन आयोग कार्यालय यांच्या वतीने जानेवारी २०२४ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक ‘पर्पल फेस्त’च्या तयारीची महत्त्वपूर्ण बैठक आज पर्वरी येथील संजय स्कूलमध्ये आयोजित केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई या बैठकीला मार्गदर्शन करणार असून अमेरिकन रॅपर तथा गायक स्पर्श शहा यांची या बैठकीला खास उपस्थिती असणार आहे.

राज्यात गेल्यावर्षी अत्यंत सुंदर पध्दतीने पार पडलेला दिव्यांग बांधवांचा ‘पर्पल फेस्त’ यंदाही जागतिक पातळीवर आयोजित होत आहे.

या सोहळ्याचे आयोजन करण्यासंबंधी सरकारने तयारीला सुरवात केली असून आयोजनाची महत्वपूर्ण बैठक सोमवार, २३ रोजी सकाळी ११ वा. पर्वरी संजय स्कूलच्या सभागृहात होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ‘पर्पल फेस्त’च्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. याशिवाय लोगो अनावरण व इतर कार्यक्रम पार पडणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मूळ भारतीय वंशाचे पण, सध्या अमेरिकास्थित जागतिक पातळीवरील वक्ते म्हणून परिचित असलेले स्पर्श शहा उपस्थित राहणार आहेत.

समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, कला संस्कृती खात्याचे सचिव सुभाष चंद्रा दिव्यांगजन आयुक्तालयाचे सचिव ताहा हाजिक, आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक अजित पंचवाडकर उपस्थित राहणार आहेत.

Sparsh Shaha
Goa News: पणजीत फिदाल्गो हॉटेलजवळ कोसळले झाड; 18 जून रस्ता ब्लॉक

दुर्मीळ आजाराने ग्रस्त ते प्रेरक वक्ता

स्पर्श शहा हे लेखक, अमेरिकन रॅपर, गायक, गीतकार आणि न्यू जर्सी, (यूएस) येथील प्रेरणादायी वक्ता आहेत. त्यांचा जन्म २००३ मध्ये न्यू जर्सीच्या आयसेलिन येथे भारतीय वंशाच्या कुटुंबात झाला. स्पर्श यांना ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा अत्यंत दुर्मीळ विकार होता. ज्याला ब्रिटल बोन डिसऑर्डर असेही म्हणतात.

जन्माच्या वेळी त्यांच्या शरीरात ३५ हून अधिक हाडे तुटलेली होती. सध्या ते एक प्रेरक वक्ता आहेत. त्यांनी आपल्या संगीत आणि भाषणाद्वारे अनेकांचे जीवन बदलण्याचे ध्येय ठेवले आहे. स्पर्श शहा यांनी यापूर्वी २०१९ मध्ये भारताला भेट दिली होती.

शाह यांनी ‘हाऊडी, मोदी’ मध्ये भारताचे राष्ट्रगीत गायले होते. वर्ल्डस ग्रेटेस्ट मोटिव्हेटर्स, लिटल बिग शॉट्सड आणि ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये त्यांचा वैशिष्ट्यीकृत समावेश होता.

त्यांना एमिनेमच्या ‘नॉट फ्राईड’ गाण्याच्या व्हायरल कव्हर व्हिडिओसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रवासावर ब्रिटल बोन रॅपर हा डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com