tree branch crashes down near Fidalgo hotel on 18 June road.
tree branch crashes down near Fidalgo hotel on 18 June road. Dainik Gomantak

Goa News: पणजीत फिदाल्गो हॉटेलजवळ कोसळले झाड; 18 जून रस्ता ब्लॉक

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

Goa News: गोव्याची राजधानी पणजीतील वर्दळीच्या 18 जून रोडवर रविवारी दुपारी एकच्या सुमारास झाड कोसळले. हॉटेल फिदाल्गोजवळ ही घटना घडली. अचानक झालेल्या प्रकाराने कुणाला काही समजले नाही. तथापि, आता हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

दरम्यान, झाड पडल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत हे झाड रस्त्यातून हटविण्याचे प्रयत्न सुरू केले.

tree branch crashes down near Fidalgo hotel on 18 June road.
National Games 2023: दुखापतीमुळे गोव्याच्या अनुराला घ्यावी लागली माघार; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झालेले नसले तरी दोन कार आणि काही दुचाकींचे मात्र नुकसान झाले आहे. भर दुपारी मोठा आवाज होत झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडली. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरातील पादचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती.

राजधानी पणजीतील हा एक महत्वाचा मार्ग आहे. तसेच या मार्गावर अनेकदा वर्दळ असते. शिवाय रविवार असल्याने पर्यटक, तसेच 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असल्यानेही या मार्गावरील वर्दळ वाढली होती.

हे झाड रस्त्यातून हटवेपर्यंत या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गांवरून वळविण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com