मोपा लिंक रोडसाठी झाडांची अवैध कत्तल रोखण्याची मागणी

सरपंचाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं मागे, सरकारवर निशाणा
Mopa Protest
Mopa ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : मोपा विमानतळ लिंक रोडसाठी बेकायदा जमिनी संपादित करुन झाडांची कत्तल त्वरित थांबवावी आणि वारखंड ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करून काम थांबवावे. या मागणीसाठी दुसऱ्याही दिवशी पीडित शेतकऱ्यांनी वारखंड पंचायतीत ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही किंवा पंचायत मंडळ येऊन आमच्या मागण्या ऐकून घेत नाही, तोपर्यंत आम्ही पंचायत कार्यालयातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर पंचायत मंडळाला आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकाव्या लागल्या. सरपंच आणि पंचायत मंडळांनी पोलिसांच्या उपस्थितीत कंपनीला नोटीस पाठवून काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. (Mopa Protest News Updates)

Mopa Protest
भरपाई मिळेपर्यंत खनिज वाहतूक रोखण्याचा इशारा

मोपा (Mopa) विमानतळ लिंक रोडसाठी वारखंड पंचायत क्षेत्रातील तुळसकरवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि बागायतीतील काजू, आंबे, फणस सागवानची झाडे जात असल्याने आंदोलन सुरु होतं. ही झाडे आणि जमिनी वाचवाव्यात यासाठी पीडित शेतकऱ्यांनी काल 21 रोजी पंचायतीला लेखी निवेदन देऊन त्याच दिवशी सायंकाळी चर्चेला बोलावले होते. मात्र पीडित शेतकरी पंचायतीत आले तरीही कोणीही पंच मंडळी फिरकली नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते.

Mopa Protest
करमल घाटात दरीत कोसळून कंटेनरचा अपघात

दरम्यान आज पुन्हा सरपंच संजय तुळसकर यांनी पीडित शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. त्या नुसार सलग दुसऱ्या दिवशी शेतकरी (Farmer) पंचायत कार्यालयात आले. मात्र पुन्हा सरपंच आणि पंच मंडळी न फिरकल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत जोपर्यंत सरपंच आणि पंच मंडळी येऊन चर्चा करत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडून जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पंचायत मंडळाला अखेर कार्यालयात येत आंदोलकांची समजूत काढावी लागली.

Mopa Protest
मोलेत वाईन शॉप जळून खाक, लाखोंचं नुकसान

पोलीस निरीक्षकांची शिष्टाई

पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक घटनास्थळी फौज फाट्यासह उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलीस (Police) निरीक्षकांनी पंचायत मंडळाला घटनास्थळी बोलावले. पंचायत कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवून काम बंद ठेवण्याची विनंती करणार असून कायदेशीर पद्धतीने पंचायत पावले उचलणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com