Ponda News : फोंड्यातील उद्यानाच्या कामाला चालना; पालिका बैठक

Ponda News : शिलकी अंदाजपत्रकही संमत, रस्त्यांवरील बेवारस वाहने हटविणार
Ponda
PondaDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News :

फोंड्याच्या मास्टरप्लॅनला पालिका मंडळाने मान्यता दिली असून टप्प्याटप्प्याने हे काम हाती घेण्यात येत आहे. सुरवातीला पालिका उद्यान तसेच फुडकोर्टच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. तसेच पालिकेचे ३६ कोटी २२ लाख २१ हजार ८०० रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक संमत करण्यात आले.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपाली कोलवेकर व इतर नगसेवक उपस्थित होते. तसेच कृषीमंत्री रवी नाईक यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत मागील बैठकीतील कामकाजाला मान्यता देण्यात आली. पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर बेवारस स्थितीत टाकून दिलेली वाहने हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत झाला. आतापर्यंत २२ वाहने रस्त्यांवर असल्याचे निदर्शनास आले आहे.

पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवर मागचा बराच काळ वाहने ठेवण्यात आल्याने सुरळीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून काही वाहने गंजल्याने ती धोकादायक स्थितीत पडून आहेत. या वाहन मालकांना सुरवातीला नोटिसा पाठवण्यात येतील. ही वाहने संबंधित मालकांनी न हटविल्यास पालिकेतर्फे ही वाहने हटविली जातील व एकाच ठिकाणी ठेवून अशा वाहनांचा लिलाव करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. बैठकीत इतर विषयांवरही चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले.

Ponda
Goa Politics: दक्षिण गोव्याचा उमेदवारही दोन ते तीन दिवसांत जाहीर केला जाईल; सदानंद शेट तानावडे

गुरांसह कुत्र्यांचाही आता बंदोबस्त!

भटक्या गुरांसाठी निरंकाल येथे कोंडवाडा उभारला असून त्याला आरोग्य खात्याचा परवाना मिळायचा बाकी आहे.

हा परवाना मिळाल्यानंतर कोंडवाड्याचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच कुर्टीत भटक्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जागा निश्चित केली आहे. या कुत्र्यांच्या लसीकरणावर भर दिला जाईल. पालिकेच्या या उपक्रमाला सरकारचे सहकार्य लाभेल असे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com