Bori News : प्रोबस क्लबतर्फे नव्या वर्षाचे स्वागत

Bori News : अध्यक्ष मनोहर तिळवे, उपाध्यक्ष अविनाश रामनाथकर, माजी अध्यक्ष अशोक तरळे, जयवंत आडपईकर उपस्थित होते.
Probus club of Ponda Hill Town
Probus club of Ponda Hill TownDainik Gomantak

Bori News : बोरी, एकमेकांच्या जीवनात आनंद फुलवून ज्येष्ठ नागरिकांनी समाधानी जीवन जगावे. त्यासाठी हास्यविनोद आणि गमती-जमती करून सदा प्रफुल्लित राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर यांनी केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रोबस क्लब ऑफ फोंडा हिलटाऊनतर्फे आयोजिलेल्या ‘सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी क्लबचे अध्यक्ष बाबलो पारकर, सचिव यशवंत तळावलीकर, कोषाध्यक्ष नरहरी नाईक, ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, उपाध्यक्ष अविनाश रामनाथकर, माजी अध्यक्ष अशोक तरळे, जयवंत आडपईकर उपस्थित होते.

यावेळी मनोहर तिळवे, नारायण नावती, जयवंत आडपईकर यांनीही विचार मांडले. यावेळी कचरा व्यवस्थापन समिती हिलदारी संस्थेचे धीरज आणि श्रद्धा सालेलकर उपस्थित होते.

Probus club of Ponda Hill Town
Fuel leak In Goa: पन्नास दिवसांनंतरही प्रभावी उपाययोजना नाही

प्रेमानंद पार्सेकर यांनी प्रार्थना म्हटली. स्वागत व प्रास्ताविक बाबलो पारकर यांनी केले. कृष्णनाथ तळावलीकर, चित्तरंजन केरकर, अंकुश नाईक, मोहन नाईक, अशोक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सूत्रसंचालन अविनाश रामनाथकर यांनी केले. त्यानंतर खेळ, विनोद, गाणी यांच्या स्पर्धा घेतल्या. त्यात दादी तळावलीकर, रामरतन वैद्य, काशिनाथ जोशी, प्रेमानंद पार्सेकर, चित्तरंजन केरकर, कृष्णनाथ तळावलीकर, जयवंत आडपईकर, मोहन नाईक,

नारायण नावती, दिलीप रायकर यांना बक्षिसे मिळाली. पुरस्कर्ते बाबलो पारकर यांनी बक्षिसे दिली. राष्ट्रगीतानंतर यशवंत तळावलीकर यांनी आभार मानले. अशोक तरळे यांनी स्नेहभोजन पुरस्कृत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com