Goa Shigmotsav 2023: मडगावात शिगमोत्सवाची तयारी सुरू; श्री सत्‍यनारायण महापूजा

शनिवारी मिरवणूक : पिंपळपेडावर दामबाबाचा घेतला आशीर्वाद
Goa Shigmotsav 2023
Goa Shigmotsav 2023Dainik Gomantak

Goa Shigmotsav 2023: मडगावात यंदा शिगमोत्‍सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आमदार दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील मडगाव शिगमोत्‍सव समितीने तयारी सुरू केली आहे.

शनिवार दि. 18 मार्च रोजी पारंपरिक व जुन्या मार्गानेच शिगमोत्‍सवाची मिरवणूक आयोजित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

आमदार कामत सध्‍या युकेच्या दौऱ्यावर असले तरी समितीने आपले काम सुरू केले आहे. शिगमोत्‍सव समितीच्या कचेरीत श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्‍यात आली होती.

यजमानपद नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व त्यांच्या पत्नी दीपा शिरोडकर यानी भूषविले. यावेळी भजनाचा कार्यक्रमही झाला. त्यानंतर समितीने पिंपळपेडावर जाऊन श्री दामबाबाचा आशीर्वाद घेतला.

Goa Shigmotsav 2023
Cashew nut farmers: काजूच्‍या पिकाला होतेय कीडीची लागण!

विविध स्‍पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन

शिगमोत्‍सवानिमित्त मडगाव नगरपालिका चौकात वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. हा उत्‍सव यशस्‍वी करण्‍यासाठी समस्‍त मडगावकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिरोडकर यांनी केले आहे. समितीचे अध्यक्ष आमदार दिगंबर कामत शिगमोत्‍सवापूर्वी गोव्यात दाखल होतील असे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com