Goa State Administration Building: पाटोत होणार 'प्रशासन स्तंभ'; असेल पणजीतील सर्वात मोठी इमारत

येत्या दोन महिन्यात पाटो येथे 'प्रशासन स्तंभ'चे भुमीपूजन आणि पायाभरणी केली जाईल.
Mantralaya At Porvorim
Mantralaya At PorvorimDainik Gomantak

Goa State Administration Building: पाटो येथे राज्य प्रशासन इमारत उभारली जाणार असून, 'प्रशासन स्तंभ' असे नाव असलेली ही इमारत पणजीतील सर्वात मोठी इमारत असेल असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

आज (मंगळवार) पर्वरीतील मंत्रालयाचे (मिनिस्टर ब्लॉक्स) उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

"येत्या दोन महिन्यात पाटो येथे 'प्रशासन स्तंभ'चे भुमीपूजन आणि पायाभरणी केली जाईल. राज्य प्रशासनाची ही इमारत पणजीतील सर्वात मोठी इमारत असेल." अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

तसेच, नव्याने उद्घाटन करण्यात आलेली संसद भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयाचे नूतनीकरण देखील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली. इतर राज्यात अशाप्रकारची मंत्रालय आहेत त्याचप्रमाणे गोवा प्रशासनाची पुढील 50 वर्षांची गरज लक्षात घेता नूतनीकरण म्हत्वाचे असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

आज राज्य स्थापना दिनाचा मुहूर्तावर पर्वरी येथे राज्य सचिवालयाजवळ नूतनीकरण करण्यात आलेल्या मिनिस्टर ब्लॉक्सचे आज (मंगळवारी) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

पर्वरीतील नव्या सुशोभीत केलेल्या इमारतीच्या बाहेर संस्कृत भाषेमध्ये ‘मन्त्रालय’ लिहिले आहे. गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाकडून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून याकरिता दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com