Ponda News : युवतींसमोरील आव्हानांवर मंगेशीत चर्चा; कुटुंब प्रबोधन गतीविधीतर्फे आयोजन

Ponda News : डॉ. प्रभू यांनी युवतींनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda News :

फोंडा, कुटुंब प्रबोधन गतीविधीतर्फे मंगेश येथे युवतींसाठी शिबिर घेण्यात आले. या संमेलनात अनेक युवती सहभागी झाल्या होत्या. युवतींसमोर असलेली आव्हाने आणि त्यांनी स्वतःच्या प्रगतीसाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी या शिबिरात वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सुरवातीला सर्व सहभागी युवतींना कुंकू लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या सात युवतींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. अमिता प्रभू यांनी ‘युवती व आरोग्य’ तसेच व्याख्याती व मुलाखतकार, निवेदिका श्रुती हजारे यांनी ‘आजची युवती उद्याची गृहिणी’ याविषयी मार्गदर्शन केले.

Ponda
Tiswadi News : नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी नाही; गोवा वेल्हा पंचायतीची स्थिती

डॉ. प्रभू यांनी युवतींनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी युवतींचे निरनिराळे गट करून अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर युवतींच्या उत्साह वर्धनासाठी काही बौद्धिक खेळ घेण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांतचे संघचालक अर्जुन चांदेकर यांनी मार्गदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com