Goa Crime: बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पेडणे पोलिसांचा छापा

Pernem Police: चारजणांना अटक; रोख रक्कम आणि इतर साहित्य घेतले ताब्यात
Pernem Police: चारजणांना अटक; रोख रक्कम आणि इतर साहित्य घेतले ताब्यात
Goa Crime Police ArrestDainik Gomantak

दाडाचीवाडी-धारगळ येथे गुरुवारी सायंकाळी एका आस्थापनात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पेडणे पोलिसांनी सायंकाळी छापा टाकून चारजणांना अटक करून त्यांच्याकडून ६५,२०० रुपयांची रोख रक्कम तसेच खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते ताब्यात घेतले.

चौघांवर भारतीय दंड संहिता कलम ११(२) अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर शिरोडकर (कांदोळी), संजय नाईक (धारगळ), पंकज कुमार (कासारवर्णे) आणि विठ्ठल वायंगणकर यांचा समावेश आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com