Pernem News : न्हयबाग-पेडण्यात शिमगोत्सव उत्साहात

Pernem News : सात दिवस वििवध कार्यक्रम साजरे, गाऱ्हाण्यानंतर सांगता
Pernem Goa Shimgotsav Festival
Pernem Goa Shimgotsav FestivalDainik Gomantak

Pernem News :

पेडणे, न्हयबाग -पेडणे येथे सतीया देवीच्या प्रांगणात बारा गावची बारा रोमटे, ढोल ताशांच्या साथीत पारंपरिक गीते म्हणत व रोमटामेळ तालगडी, घुमटवादन व गुलाल उधळत सात दिवसीय शिमगोत्सवाची सांगता झाली.

महिलांनी सतीया देवीची ओटी भरली. तर भाविकांनी देवीला श्रीफळ व पुष्पहार अर्पण केले.

सात दिवसांपूर्वी होळी घालून व हळदुण्याने शिमगोत्सवाला प्रारंभ झाला होता. प्रथेनुसार मालपे येथील श्री मुळवीर भुतवाडी, अमई, वळपे, सरमळे येथील माउली, पणशीवाडा, पराष्टे, नानेरवाडा, रवळनाथ पेडणे, नयबाग, पोरस्कडे व खाजने व इतर मिळून एकूण बारा रोमटे येथे रोमटे येथे दाखल होऊन गुलाल उधळल्याने सगळा परिसर गुलाबी झाला होता. शेवटी गाऱ्हाणे झाल्यावर सात दिवसीय शिमगोत्सवाची सांगता झाली.

न्हयबाग पुलावर गर्दी :

शिमगोत्सवात गोव्यासह जवळच्या सिंधुदुर्गमधील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नयबाग पुलावर भाविकांची मोठी गर्दी होती, अनेकांनी या ठिकाणी या उत्सवाचा आनंद लुटला.

गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे या शिमगोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. सकाळच्या सत्रात विशेषतः महिलांनी नईबाग येथील सतीया देवीचा खण व श्रीफळाने ओटी भरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com