Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News : पार्से हायस्कूलमध्ये ‘पर्यावरण मिरवणूक’; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pernem News : वेदा देवरुखकर हिने पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. झाडे व डोंगर कापणी पूर्णपणे थांबवा. कचरा, ध्वनी, जल, हवा प्रदूषण पूर्णपणे थांबवल्यास आपल्याला निरोगी जीवन जगता येईल, असे सांगितले.

Pernem News :

पेडणे, पार्से हायस्कूल पार्से येथे पाच जून हा जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. प्रार्थना सत्रानंतर कार्यक्रम प्रमुख सुनील बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा उद्देश कथन केला. पर्यावरणाचे जतन करण्याची शपथ याप्रसंगी देण्यात आली.

वेदा देवरुखकर हिने पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. झाडे व डोंगर कापणी पूर्णपणे थांबवा. कचरा, ध्वनी, जल, हवा प्रदूषण पूर्णपणे थांबवल्यास आपल्याला निरोगी जीवन जगता येईल, असे सांगितले.

Pernem
Goa's Environment: गोव्याचे पर्यावरण! गतवैभव, सध्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने

पार्से हायस्कूलचे बालवीर व वीरबालांनी पर्यावरणाची जागृती निर्माण करण्यासाठी शाळेपासून भगवती मंदिरापर्यंत जागृती फेरी काढली. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत नाईक यांनी रॅलीला सुरवात झाल्याची घोषणा केली. या फेरीत शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. शिक्षक सुनील बेळगावकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com