Sunburn Goa: सनबर्न खासगी का सरकारी? महोत्सवावरुन प्रमोद सावंत सरकारवर टीका

सनबर्नच्या तिकिटांचा काळा बाजार ते महोत्सवात 300 रुपये किंमतीने विक्री होणाऱ्या पाण्याच्या बॉटलचा देखील उल्लेख केला आहे.
Sunburn Goa
Sunburn GoaDainik Gomantak

Sunburn Goa: गोव्यात आज (गुरुवार, 28 डिसेंबर) पासून सनबर्न ईडीएम संगीत महोत्सव होत आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रकार घडू नयेत यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील सरकारी आणि पोलीस यंत्रणा सर्वोत्परी सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव खासगी का सरकारी आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

'गोवा सरकार सनबर्न महोत्सवासाठी तयार झाले आहे, हा सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते. सामान्य करदात्यांच्या पैशावर मशीनसह हजारो लोक तैनात करण्यात आले आहेत,' असे 99 गोवा या ट्विटर युजरने ट्विट केले आहे.

याच ट्विटमध्ये युजरने सनबर्नच्या तिकिटांचा काळा बाजार ते महोत्सवात 300 रुपये किंमतीने विक्री होणाऱ्या पाण्याच्या बॉटलचा देखील उल्लेख केला आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रष्टाचारावर यात भाष्य करण्यात आले आहे.

Sunburn Goa
Mopa Dhargal Link Road: मोपा विमानतळ ते धारगळ लिंक रोडचे काम अंतिम टप्यात, मार्चमध्ये होणार खुला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील सनबर्न महोत्सव आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या अमली पदार्थ गैरवापरावर भाष्य केले आहे.

'पोर्टेबल मशीन तैनात करुन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक गोव्यात अमली पदार्थ उपलब्ध असल्याचे सांगतायेत का? भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गोवा ड्रग्ज डेस्टिनेशन होत असल्याचा हा पुरावा आहे. कोणाच्या आदेशाने गोव्यात अमली पदार्थ येतायेत याचे पोलीस महासंचालकांनी उत्तर द्यावे,' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

गोव्यात होणारा सनबर्न ईडीएम महोत्सव मागील वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्दावरुन महोत्सव आयोजनाचा वाद न्यायालयात गेला. गेल्या वर्षी महोत्सवाला देण्यात आलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

यावर्षी सनबर्न पेडणे का वागातोरला होणार यावरुन वादाला सुरुवात झाली. तसेच 31 डिसेंबरला महोत्सवाला परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली. सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर सनबर्न एक दिवस आधीच सुरु होत आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, गैरकृत्यांवर नजर ठेवत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com