Mopa Dhargal Link Road: मोपा विमानतळ ते धारगळ लिंक रोडचे काम अंतिम टप्यात, मार्चमध्ये होणार खुला

लिंक रोडसाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.
Mopa Dhargal Link Road
Mopa Dhargal Link RoadDainik Gomantak

Mopa Dhargal Link Road: मोपा विमानतळ ते धारगळ लिंक रोडचे काम अंतिम टप्यात आले असून, येत्या मार्चमध्ये हा मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे मोपा विमानतळावर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या लिंक रोडसाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

यावर्षी ऑगस्टमध्येच लिंक रोडचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे कामाला विलंब झाला. दरम्यान, आता कामाने वेगात सुरु असून येत्या मार्चमध्ये लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता बांधकाम खात्याने व्यक्त केली आहे.

मोपा येथे उभारण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवशांचा ओघ वाढला आहे. नव्याने होत असलेल्या लिंक रोडमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

मगील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. 5 जानेवारी 2023 पासून विमानतळावरुन नियमित विमान वाहतुकीला प्रारंभ झाला. विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून मोपा मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. लिंक रोड सुरु झाल्यानंतर प्रवास अधिक जलद आणि सुखर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com