Goa Monsoon 2023: ‘कुशावती’ नदीला पूर; पारोडा पूल पाण्याखाली, रस्त्यावरही पाणी

मडगाव-कुडचडे वाहतूक वळविली चांदरमार्गे
Paroda Bridge Submerged
Paroda Bridge SubmergedDainik Gomantak

कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आला असून पारोडा पूल पाण्याखाली गेला आहे. तर, केपे-मडगावदरम्यानच्या रस्त्यावर पारोडा येथे पाणी साचल्‍याने या रस्त्यावरील वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली.

शुक्रवारी दिवसा आणि रात्रीही पावसाने केपे तालुक्‍याला झोडपून काढले. त्‍यामुळे कुशावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली. परिणामी शनिवारी सकाळी पारोडा पूल यावर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला.

पारोडा व असोल्डा गावांना जोडणाऱ्या या पुलावरून पाणी वाहत असल्‍याने तेथून होणारी वाहतूक केपे-आमोणामार्गे वळविण्यात आली. दुपारी १२ वाजता नदीचे पाणी केपे-मडगाव मुख्य रस्त्यावर आल्याने केपे पोलिसांनी या मार्गावरून होणारी वाहतूकही चांदरमार्गे वळविली.

Paroda Bridge Submerged
Drishti Marine: बीचवर जाताय? जीवरक्षक दृष्टी मरीनने दिला 'हा' इशारा

दरम्‍यान, कुडचडे, केपे, मडगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचा काही भाग पावसाळ्‍यात पाण्याखाली जात असल्याने तेथील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. या रस्त्यांची उंची वाढवावी किंवा नवीन बगलमार्ग उभारावा, अशीही मागणी होत आहे.

नवीन उंच पूल उभारण्‍याची मागणी

पारोडा पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात कुशावती नदीला पूर येतो. त्‍यामुळे हा पूल पाण्याखाली जातो. साहजिकच या भागात राहणाऱ्या लोकांना मोठा वळसा घालून आपले घर गाठावे लागते. सरकारने या नदीवर उंच पूल उभारून या त्रासातून लोकांची सुटका करावी अशी लोकांनी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com