शाळा इमारतीच्या प्रश्नावरून शिरगावमधील पालक आक्रमक, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

शाळेच्या मुद्यावरून कोणीही चुकीची आणि खोटी माहिती पसरवू नये - आमदार प्रेमेंद्र शेट
Shirgao Goa Govt School Building Issue
Shirgao Goa Govt School Building Issue

Shirgao Goa Govt School Building Issue: सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या प्रश्नावरून शिरगावमधील पालक आता आक्रमक बनले आहेत. या शाळेसाठी विनाविलंब नवीन इमारत बांधा, अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही.

वेळप्रसंगी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असा इशारा पालक-शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष प्रेमदास सावंत यांनी गुरुवारी (ता.23) शिरगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गावकर, शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष लक्ष्मी कवठणकर यांच्यासह जवळपास पंधरा पालक उपस्थित होते. शिरगावमधील सरकारी शाळेची इमारत मोडकळीस आली असून, चालू शैक्षणिक वर्षारंभीच शाळेत पावसाची गळती सुरू झाली. परिणामी या शाळेतील वर्ग तेथीलच देवस्थानच्या मालकीच्या एका बंद घरात स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांचा आकडा पाहता, वर्ग स्थलांतरित करण्यात आलेली जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे शाळेतील मुलांची मोठी गैरसोय होत आहे. इमारत बांधण्यास चालढकलपणा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पालकांनी दिला आहे.

शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. सरकारी पातळीवरील काम अंतिम टप्प्यात आहे. वास्तविक सध्याच्या इमारतीला गळती लागली, त्यावेळी छपराची दुरुस्ती करण्याचा विचार होता.

मात्र, पालकांच्याच मागणीमुळे नवीन इमारतीचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. शाळेच्या मुद्यावरून कोणीही चुकीची आणि खोटी माहिती पसरवू नये असे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com