Panaji News : ‘धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई करा’; दक्षिण गोवा शिष्टमंडळ

Panaji News : धार्मिक व्यक्तींबद्दल अपमानास्पद टिप्पणी करू नये आणि गोव्यातील समुदायांमध्ये तेढ निर्माण करू नये, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करून गोवावासीयांच्या धा​र्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन मायकल ग्रेसियस आणि फिडोल परेरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस महानिरीक्षक कार्यालयात दिले.

धार्मिक व्यक्तींबद्दल अपमानास्पद टिप्पणी करू नये आणि गोव्यातील समुदायांमध्ये तेढ निर्माण करू नये, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.

सोमवारी संध्याकाळी दक्षिण गोव्यातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला भेट दिली व निवेदन दिले. त्यानंतर, मायकल ग्रेसियस यांनी पत्रकारांना सांगितले, की ए. बॅनर्जी नावाच्या गोव्यातील व्यक्तीने संत फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पण्या लिहिल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, की सोशल मीडियावर अशाप्रकारची द्वेषयुक्त भाषणे आणि टिप्पण्या समुदायांमध्ये फूट निर्माण करण्यासाठी हेतुपुरस्सर पसरवली जातात. यावर गोवा पोलिसांच्या कारवाईची आम्ही वाट पाहात आहोत.

Panaji
Goa Disaster Management: 'सचेत' मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा :

फिडोल परेरा यांनी यावेळी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी आमची मागणी आहे आणि त्यांनी सर्व लोकांना स्पष्ट संदेश द्यावा की कोणत्याही धार्मिक व्यक्तींबद्दल अशा अपमानास्पद टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.

सर्व गोवावासी संत फ्रान्सिस झेवियर यांना ‘गोंयचो साहेब’ म्हणून मानतात. मग काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहेत, हे कळत नाही. आमच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com