पणजी पोलीस स्‍थानक हल्‍लाप्रकरणी मोन्‍सेरात दाम्पत्याला मोठा दिलासा; सुनावणीला गैरहजर रहाण्‍यास मुभा

बाबूश तीन तर जेनिफर यांना दोन महिने सुनावणीस गैरहजर रहाण्‍याची मुभा.
Babush And jennifer monserrate
Babush And jennifer monserrateDainik Gomantak

Panjim Police Station Attack Case: पणजी पोलीस स्‍थानक हल्‍ला प्रकरणात महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या आमदार पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात या दोघांनाही दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांनी तात्‍पुरता दिलासा देताना बाबूशना तीन तर जेनिफरना दोन महिने या प्रकरणाच्‍या सुनावणीस गैरहजर रहाण्‍याची मुभा दिली.

2008 साली झालेल्‍या या प्रकरणाची सुनावणी राजकारण्‍यांचे खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर चालत असून या प्रकरणाच्‍या सुनावणीस आपल्‍याला कायमस्‍वरुपी गैरहजर रहाण्‍याची परवानगी द्यावी अशी मागणी मोन्‍सेरात दाम्‍पत्‍याने केली होती. ही मागणी अशंत: मान्‍य करताना वरील आदेश दिला.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारी रोजी ठेवण्‍यात आली आहे. या प्रक़रणात बाबूश व जेनिफर यांच्‍या व्‍यतिरिक्‍त आणखी 35 संशयितांवर सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com