Panaji News : अग्निशमन दलाचा वार्षिक तपासणी दिवस उत्साहात

Panaji News : कवायत स्पर्धेतील पहिले बक्षीस पणजी अग्निशामक दलाला देण्यात आले. लॅडर ड्रिलचे पहिले बक्षीस मुख्यालय दलाला मिळाले.
Fire Bridage
Fire Bridage Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, अग्निशमन दलाचे वार्षिक तपासणी दिवस संचलन सांतईनेज येथील दलाच्या मुख्यालयात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वित्त प्रधान सचिव डॉ. व्ही. कँडेवेलू हे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दलाच्या जवानांना कवायत स्पर्धा व वार्षिक क्रीडा स्पर्धांसाठीची बक्षीसे प्रदान करण्यात आली. त्यापूर्वी डॉ. कँडेवेलू व दलाचे संचालक नितीन रायकर यांनी संचलनाचे निरीक्षण केले.

कवायत स्पर्धेतील पहिले बक्षीस पणजी अग्निशामक दलाला देण्यात आले. लॅडर ड्रिलचे पहिले बक्षीस मुख्यालय दलाला मिळाले. पंप ड्रिलचे बक्षीस म्हापसा दलाला प्राप्त झाले. रस्सीखेच स्पर्धेचे पहिले बक्षीस मुख्यालयाला प्राप्त झाले. उत्कृष्ट टर्न आउट म्हणून गणेश गोवेकर, रोहिदास परब,

Fire Bridage
Goa Accident Death: मद्यपी चालकामुळे टेम्‍पो ओहोळात उलटून 2 ठार

सखाराम पेडणेकर, फ्रान्सिस्को आझावेदो, बाबलो माजिक, गुरुनाथ भट देसाई, उमेश आचारी, डॉमनिक मार्टिन्स, ज्ञानेश्‍वर मांद्रेकर यांची निवड झाली. क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस मध्य विभागास, फुटबॉलचे दक्षिण विभागास आणि व्हॉलिबॉलचे उत्तर विभागास प्राप्त झाले.प्रारंभी नितीन रायकर यांनी स्वागत केले. प्रधान वित्त सचिव कँडेवेलू यांनी अग्निशामक दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com