Panaji News : पणजीत गटारांची सफाई तरीही पाणी तुंबण्याचा प्रश्‍न

Panaji News : त्यामुळे या कामांसह महत्त्वाची अशी मळ्यातील रस्त्यांची, महात्मा गांधी रस्ता, १८ जून मार्ग आणि आत्माराम बोरकर रोड यांना स्मार्ट करण्याचे काम पावसाळ्यानंतर होणार आहे, हे ‘आयपीएससीडीएल’ने जाहीर केले आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, मागील काही आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पणजीतील १८ जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्ग पाण्याखाली गेले होते. याशिवाय ठिकठिकाणी पाणी साचण्याचा प्रकार घडला होता; परंतु त्यानंतर पोर्तुगीजकालीन गटारांची सफाई महानगरपालिकेने हाती घेतली.

२५ ते ३० वर्षांपासून सफाई न झालेल्या गटारांची सफाई झाली असली तरी पर्जन्यमानाचा जोर अधिक राहिला तर पाणी साचण्याच्या घटना घडणार नाहीत, असे म्हणता येणार नाही.

पणजीत सध्या दक्षिण-उत्तर अशा जोडरस्त्यांची बहुतांश कामे झालेली आहेत. मार्केट परिसरातील रस्त्याचे काम त्याचबरोबर मध्य पणजीतील हॉटेल डेल्मनसमोरील व गीता बेकरीकडे येणाऱ्या मार्गांचे काम होणे बाकी आहे.

Panaji
Goa Smoking Addiction: गोव्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक, ग्रामीण भागात युवक गुटख्याच्या आहारी

त्यामुळे या कामांसह महत्त्वाची अशी मळ्यातील रस्त्यांची, महात्मा गांधी रस्ता, १८ जून मार्ग आणि आत्माराम बोरकर रोड यांना स्मार्ट करण्याचे काम पावसाळ्यानंतर होणार आहे, हे ‘आयपीएससीडीएल’ने जाहीर केले आहे.

अजूनही शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर रिअल हॉटेलकडे मॅनहोलचे काम सुरू आहे. हे काम आता आठवड्याभरात होईल, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे या मार्गावरील मॅनहोलची कामे पावसाळ्यानंतरच घेतली जाण्याची शक्यता आहे. १८ जून मार्गावरील मॅनहोलची कामे झाली असली तरी मुख्यत्वे रस्त्याखालून दक्षिण-उत्तर गेलेल्या गटाराचे काम करणे महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com